अंधश्रद्धा निर्मूलन हा ध्यास आहे...

By admin | Published: July 25, 2016 03:21 AM2016-07-25T03:21:45+5:302016-07-25T03:21:45+5:30

‘माणूस मारता येतो, विचार मारता येत नाहीत’, ‘विवेकाचा आवाज बुलंद करू या’ व ‘अंधश्रद्धा निर्मूलन हा ध्यास आहे, तोच आमचा श्वास आहे’

It's a torch to eliminate superstition ... | अंधश्रद्धा निर्मूलन हा ध्यास आहे...

अंधश्रद्धा निर्मूलन हा ध्यास आहे...

Next

मुंबई : ‘माणूस मारता येतो, विचार मारता येत नाहीत’, ‘विवेकाचा आवाज बुलंद करू या’ व ‘अंधश्रद्धा निर्मूलन हा ध्यास आहे, तोच आमचा श्वास आहे’ यांसारख्या घोषणांनी व वंदना शिंदे यांनी गायलेल्या चळवळीतील गीतांनी मुंबई दुमदुमून गेली. निमित्त होते ते ‘निर्भय प्रभातफेरी’चे.
डॉ. नरेंद्र दाभोलकर, कॉ. गोविंद पानसरे, डॉ. एम. एम. कलबुर्गी यांचे मारेकरी शोधण्यात शासनाला आलेल्या अपयशाच्या निषेधार्थ महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फे २० आॅगस्टपर्यंत ‘हिंसा के खिलाफ, मानवता की ओर’ हे राष्ट्रीय अभियान राबविण्यात येणार आहे. २० जुलैपासून अभियानाचा प्रारंभ झाला असून, २४ जुलै रोजी या अभियानांतर्गत मुंबईत ‘निर्भय प्रभातफेरी’चे आयोजन करण्यात आले होते.
अंधेरीमधील भवन्स महाविद्यालय येथून सकाळी साडेसात वाजता प्रभातफेरी काढण्यात आली. प्रभातफेरीत मअंनिस व राष्ट्र सेवा दल यांच्या कार्यकर्त्यांबरोबर भवन्स महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. प्रभातफेरीची सांगता सकाळी १० वाजता सात बंगला येथील नाना-नानी पार्कमध्ये झाली. (प्रतिनिधी)

Web Title: It's a torch to eliminate superstition ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.