रायगडमधील दुर्घटनेतील जखमींवर जे. जे रुग्णालयात उपचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2021 04:06 AM2021-07-25T04:06:09+5:302021-07-25T04:06:09+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : तळीये गावातील दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेतील जखमींना जे. जे. रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. ...

J. on the injured in the accident in Raigad. Which hospital treatment | रायगडमधील दुर्घटनेतील जखमींवर जे. जे रुग्णालयात उपचार

रायगडमधील दुर्घटनेतील जखमींवर जे. जे रुग्णालयात उपचार

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : तळीये गावातील दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेतील जखमींना जे. जे. रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. या जखमींच्या प्रकृती स्थिर असल्याची माहिती जे.जे. रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. संजय सुरासे यांनी दिली आहे.

जे.जे. रुग्णालयात दाखल असणाऱ्या जखमींमध्ये स्वप्निल शिरावले (२६), स्वाती कोंडाळकर (२१), रेश्मा कोंडाळकर (३८), संगीता कोंडाळकर (४१), पोलादपूरमधील सुतारवाडी येथील नीलिमा सुतार (२८), भरत सुतार (५०), सार्थक सुतार (४), नीतेश सुतार (३२) इ. चा समावेश आहे. डॉ. सुरासे यांनी सांगितले, या जखमींपैकी काहींना किरकोळ जखमा, तर काहींच्या हात व पायाला फ्रॅक्चर झाले आहे. परंतु, सुदैवाने कुणीही गंभीर जखमी नसल्याने लवकरच या जखमींवर उपचार करून त्यांना घरी पाठविण्यात येईल.

Web Title: J. on the injured in the accident in Raigad. Which hospital treatment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.