लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : तळीये गावातील दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेतील जखमींना जे. जे. रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. या जखमींच्या प्रकृती स्थिर असल्याची माहिती जे.जे. रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. संजय सुरासे यांनी दिली आहे.
जे.जे. रुग्णालयात दाखल असणाऱ्या जखमींमध्ये स्वप्निल शिरावले (२६), स्वाती कोंडाळकर (२१), रेश्मा कोंडाळकर (३८), संगीता कोंडाळकर (४१), पोलादपूरमधील सुतारवाडी येथील नीलिमा सुतार (२८), भरत सुतार (५०), सार्थक सुतार (४), नीतेश सुतार (३२) इ. चा समावेश आहे. डॉ. सुरासे यांनी सांगितले, या जखमींपैकी काहींना किरकोळ जखमा, तर काहींच्या हात व पायाला फ्रॅक्चर झाले आहे. परंतु, सुदैवाने कुणीही गंभीर जखमी नसल्याने लवकरच या जखमींवर उपचार करून त्यांना घरी पाठविण्यात येईल.