जे. जे. रुग्णालयाच्या अधिष्ठातापदावरून डॉ. तात्याराव लहाने कार्यमुक्त

By ऑनलाइन लोकमत | Published: October 5, 2017 09:32 PM2017-10-05T21:32:57+5:302017-10-05T21:38:55+5:30

जे. जे. रुग्णालयाच्या अधिष्ठातापदावरून डॉ. तात्याराव लहाने गुरुवारी कार्यमुक्त झाले. त्यांची आता वैद्यकीय शिक्षण सहसंचालकपदावर पदोन्नती करण्यात आली आहे.

J. J. The hospital's doctorate from Dr. Tataranrao is a work away from home | जे. जे. रुग्णालयाच्या अधिष्ठातापदावरून डॉ. तात्याराव लहाने कार्यमुक्त

जे. जे. रुग्णालयाच्या अधिष्ठातापदावरून डॉ. तात्याराव लहाने कार्यमुक्त

googlenewsNext
ठळक मुद्देअधिष्ठातापदावरून डॉ. तात्याराव लहाने कार्यमुक्तडॉ. सुधीर नणंदकर नवे अधिष्ठाताडॉ. तात्याराव लहाने आता वैद्यकीय शिक्षण सहसंचालकपदी

मुंबई : जे. जे. रुग्णालयाच्या अधिष्ठातापदावरून डॉ. तात्याराव लहाने गुरुवारी कार्यमुक्त झाले. त्यांची आता वैद्यकीय शिक्षण सहसंचालकपदावर पदोन्नती करण्यात आली आहे. तर, जे. जे. रुग्णालयाच्या अधिष्ठातापदी डॉ. सुधीर नणंदकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. 
2010 पासून ते सर जे.जे रुग्णालयात अधिष्ठाता म्हणून कार्यरत होते. डॉ. तात्याराव लहाने यांनी गेली 22 वर्ष जे.जे रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांची सेवा केली आहे. जे. जे रुग्णालयाचा कायापालट करण्यामागे डॉ. तात्याराव लहाने यांचे प्रामुख्याने नाव घेतले जाते. जे.जे रुग्णालयात त्यांनी नेत्ररोगतज्ज्ञ म्हणून जबाबदारी स्विकारल्यानंतर नेत्रविभागाचा प्रमुख म्हणूनही काम केले. त्यानंतर त्यांची याच रुग्णालयाचे आणि विद्यापिठाचे अधिष्ठाता म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. 
रुग्णालयाच्या अधिष्ठातापदावरून कार्यमुक्त झाल्यानंतर डॉ. तात्याराव लहाने यांनी सांगितले की, मी अधिष्ठाता पदाचा कार्यभार फॉरेन्सिक विभागाचे वरिष्ठ डॉ. सुधीर नणंदकर यांना सुपूर्त करत आहे. मी राज्याच्या वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचलनालयात इतर सह-संचालकांसोबत काम करेन आणि सर जे.जे रुग्णालयात रुग्णांची सेवा करण्याचे काम सुद्धा करणार आहे. 
डॉ. तात्याराव लहाने यांनी 2010मध्ये सर जे.जे रुग्णालयात पहिल्यांना स्वच्छता मोहीम हाती घेतली होती. तसेच त्यांच्या पुढाकाराने रुग्णालयात एचएमआयआयएस प्रोजेक्टची सुरूवात करण्यात आली होती.याचबरोबर, सर्वाधिक जास्त मोतीबिंदूच्या शस्त्रक्रियांसाठी आणि ग्रामीण भागात त्यांच्या आरोग्य शिबिरांसाठी त्यांचे नाव लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंदवण्यात आले आहे.

Web Title: J. J. The hospital's doctorate from Dr. Tataranrao is a work away from home

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.