मुंबई, दि. 30 - जातीची लेबलं लावून इतिहासाकडे पाहू नका, इतिहासावर चर्चा नाही, फक्त आरोप करतात, असा हल्लाबोल राज ठाकरेंनी विरोधकांवर केला आहे. ज्यांनी पूर्ण आयुष्य शिव व्याख्यानं आणि शिवचरित्र लिहिण्यात घालवली. त्या बाबासाहेब पुरंदरेंना महाराष्ट्रात पोलीस संरक्षण घेऊन फिरावं लागणं, हे दुर्दैव असल्याचं राज ठाकरे म्हणाले आहेत. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या 95 व्या वाढदिवसानिमित्त मुंबईत आज ‘शिवशाहीर सन्मान सोहळा’ कार्यक्रमाचं आयोजन करण्या आलं होतं, त्यावेळी राज ठाकरे बोलत होते. विलेपार्लेमधील दीनानाथ मंगेशकर नाट्यगृहात या सन्मान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाला राज ठाकरेंसह सचिन तेंडुलकरनंही हजेरी लावली. राज ठाकरेंनी महाराष्ट्र भूषण पुरस्कारावरून झालेल्या वादाची आठवण करून देत विरोधकांवर टीका केली आहे.
जातीची लेबलं लावून इतिहासाकडे पाहू नका- राज ठाकरे
By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2017 11:22 PM
जातीची लेबलं लावून इतिहासाकडे पाहू नका, इतिहासावर चर्चा नाही, फक्त आरोप करतात, असा हल्लाबोल राज ठाकरेंनी विरोधकांवर केला आहे.
ठळक मुद्देजातीची लेबलं लावून इतिहासाकडे पाहू नकाइतिहासावर चर्चा नाही, फक्त आरोप करतातबाबासाहेब पुरंदरेंना महाराष्ट्रात पोलीस संरक्षण घेऊन फिरावं लागणं, हे दुर्दैव असल्याचं राज ठाकरे म्हणाले