मुंबई : वैद्यकीय सेवा कोलमडू नये, रुग्णांचे हाल होऊ नयेत म्हणून डॉक्टरांनी मासबंक मागे घ्यावा, असे आवाहन करुन चौकशी समिती नेमण्याचे आश्वासन जेजेतील निवासी डॉक्टरांना राज्य सरकारकडून देण्यात आले. तरीही, निवासी डॉक्टरांनी गुरुवारीही मासबंक सुरु ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. जेजे रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. तात्याराव लहाने आणि नेत्रचिकित्सा विभाग प्रमुख डॉ. रागिणी पारेख यांच्या बदलीच्या मागणीसाठी जेजे मार्डने मासबंक केला आहे. या संदर्भात जे. जे. रुग्णालयाचे मार्ड प्रमुख डॉ. परम सत्पथी म्हणाले की, मंत्र्यांबरोबर झालेल्या बैठकीत या प्रकरणी चौकशी समिती नेमण्याचे आम्हाला आश्वासन देण्यात आले पण या दोघांच्या बदलीच्या मागणीवर आम्ही ठाम आहोत. (प्रतिनिधी)
जेजेतील डॉक्टरांचा संप सुरूच
By admin | Published: April 07, 2016 1:54 AM