वेणगावची जागृत महालक्ष्मी देवी

By admin | Published: September 30, 2014 11:23 PM2014-09-30T23:23:43+5:302014-09-30T23:23:43+5:30

कर्जत रेल्वे स्थानकापासून पूर्वेकडे पाच किलोमीटर अंतरावर कर्जत - जांभिवली रस्त्यावर वेणगाव येथे श्री महालक्ष्मी स्वयंभू देवस्थान आहे.

Jagal Mahalaxmi Devi, the awakened of Vengapur | वेणगावची जागृत महालक्ष्मी देवी

वेणगावची जागृत महालक्ष्मी देवी

Next
>विजय मांडे - कर्जत
कर्जत रेल्वे स्थानकापासून पूर्वेकडे पाच किलोमीटर अंतरावर कर्जत - जांभिवली रस्त्यावर  वेणगाव येथे श्री महालक्ष्मी स्वयंभू देवस्थान आहे. हे महालक्ष्मी देवस्थान अतिप्राचीन असून पंचक्र ोशीत तसेच बाहेरही प्रसिध्द असे जागृत देवस्थान आहे.
1857 च्या आंदोलनातील पुढारी नानासाहेब पेशव्यांचा जन्म या वेणगाव येथे झाला. नवरात्नीला श्री महालक्ष्मी मंदिरात उत्सव व यात्ना भरत असल्याचा उल्लेख महाराष्ट्र राज्य गॅङोटियरच्या रायगड जिल्हय़ातील प्रेक्षणीय स्थळामध्येही नोंद आहे. या देवस्थानची आख्यायिका अशी की, कोल्हापूरची श्री महालक्ष्मी आपल्या बहिणीस भेटायला जाताना तिच्या रथाचे चाक घसरले व थोडय़ाच अंतरावर रथाच्या एका घोडय़ाचा पाय घसरला. श्री महालक्ष्मी तेथेच वास करून राहिली, ते ठिकाण म्हणजेच सद्यस्थितीतील असलेले श्री महालक्ष्मी मंदिर.  देवीच्या रथाचे चाक व घोडय़ाचा पाय जेथे घसरला ती ठिकाणो मंदिर परिसरात आजही पहावयास मिळतात. सुमारे दोनशे वर्षापूर्वी वेणगाव येथील एका गावक:याच्या स्वप्नात देवीने येऊन  दृष्टांत दिला व गावक:यांनी तिथे निवारा बांधला व देवीची दैनंदिन पूजा-अर्चा, सांजवात सुरु  केली व ती आजतागायत अव्याहतपणो सुरु  आहे. काळाच्या ओघात मंदिर जीर्ण झाले होते, भाविकांच्या वाढत्या गर्दीमुळे होणारी गैरसोय टाळण्यासाठी श्रध्दास्थानाचा जीर्णोध्दार 1997 साली विश्वस्त समितीने केला.     येथे त्रिपुरारी पौर्णिमा, हनुमान जयंती, होळी पौर्णिमा, सीमोल्लंघन व माघी गणोशोत्सव कार्यक्रम केले जातात.
 
भक्तांचे o्रध्दास्थान
4देवीचे स्थान स्वयंभू असून तिच्या नवसाची प्रचिती अनेक भक्तांना आलेली आहे, यामुळे कर्जत पंचक्र ोशी तसेच लांबूनलांबून भक्तगण श्री महालक्ष्मीच्या दर्शनास अखंड येत असतात. हे मंदिर अतिशय रम्य अशा ठिकाणी आहे. 
4आजूबाजूला डोंगर, शेती, वनश्री असल्याने या परिसरात आल्यावर खूपच प्रसन्न वाटते.      

Web Title: Jagal Mahalaxmi Devi, the awakened of Vengapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.