गुरु नानक महाविद्यालयात मराठी भाषेचा जागर; ग्रंथालयाने मराठी पुस्तकांचे प्रदर्शन
By सीमा महांगडे | Published: January 28, 2024 11:49 PM2024-01-28T23:49:59+5:302024-01-28T23:52:15+5:30
गुरु नानक महाविद्यालयाच्या मराठी भाषा आणि वाङ्मय मंडळाने मराठी भाषेच्या गौरवार्थ आणि सन्मानार्थ मराठी भाषा संवर्धन पंधरवडा आयोजित करण्यात आला होता.
मुंबई : गुरु नानक महाविद्यालयाच्या मराठी भाषा आणि वाङ्मय मंडळाने मराठी भाषेच्या गौरवार्थ आणि सन्मानार्थ मराठी भाषा संवर्धन पंधरवडा आयोजित करण्यात आला होता. १५ दिवस चालेल्या या कार्यक्रमात विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. मराठी भाषेविषयी रुची निर्माण व्हावी यासाठी ग्रंथालयाने मराठी पुस्तकांचे प्रदर्शन भरवण्यात आले.
मंडळाने मराठीतील गाजलेल्या चित्रपट विद्यार्थ्यांना दाखवले. या कार्यक्रमात बंगाली , पंजाबी , तमिळ, तेलगू , कन्नड, मल्यायम, उर्दू , भोजपुरी , आसमी, द्राविड व सौराष्ट्र अशा विविध प्रांतातील भाषिक शिक्षवृंद शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यानी सहभाग घेतला. सगळ्यांनी मराठी भाषेमध्ये भाषण व काव्यरचना आणि मराठी भाषेमधून उपस्थित आजि व माझी विध्यार्थी मित्रांना व इतर श्रोत्यांना मराठी भाषेतून अनेक प्रकारचे संदेश देण्यात आले. कायक्रमाचे आयोजन महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. पुष्पिन्दर कौर भाटिया यांच्या मार्गदर्शनात आणि मराठी भाषा आणि वाङ्मय मंडळ प्रमुख प्राध्यापक अनुराधा नामजोशी यांच्या अध्यक्षात करण्यात आले.