शिक्षण, बेरोजगारीच्या मुद्द्यावर जागर जत्था!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2018 03:55 AM2018-02-05T03:55:52+5:302018-02-05T03:56:08+5:30

शिक्षणाची संधी व रोजगाराची हमी असे अनेक आश्वासन देणा-या सरकारने तरुणांची निराशा केला, असा आरोप करत, युवा आणि विद्यार्थ्यांच्या संघटनांनी सरकार विरोधात जागर जत्था काढण्यास सुरुवात केली आहे.

Jagar Sangat on education, unemployment issues! | शिक्षण, बेरोजगारीच्या मुद्द्यावर जागर जत्था!

शिक्षण, बेरोजगारीच्या मुद्द्यावर जागर जत्था!

googlenewsNext

मुंबई : शिक्षणाची संधी व रोजगाराची हमी असे अनेक आश्वासन देणा-या सरकारने तरुणांची निराशा केला, असा आरोप करत, युवा आणि विद्यार्थ्यांच्या संघटनांनी सरकार विरोधात जागर जत्था काढण्यास सुरुवात केली आहे. डेमोक्रेटिक युथ फेडरेशन आॅफ इंडिया (डीवायएफआय) आणि स्टुडंट्स फेडरेशन आॅफ इंडिया (एसएफआय) यांनी संयुक्तिरीत्या या जत्थ्यांचे आयोजन केले आहे. रविवारी ४ फेब्रुवारीला सुरुवात झालेल्या या जत्थ्यांचा समारोप ११ फेब्रुवारीला सोलापूर येथे होणार आहे.
नंदूरबार येथून सुरू होणारा जत्था, धुळे, नाशिक, पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, पुणे, सांगली, सातारा आणि कोल्हापूर या जिल्ह्यांतून जाईल. डीवायएफआय राज्य सरचिटणीस प्रीती शेखर व एसएफआय राज्य सरचिटणीस बालाजी कलेटवाड हे जत्थ्याचे नेतृत्व करतील. नांदेड येथून सुरू होणारा जत्था किनवट, परभणी, जालना, औरंगाबाद, बीड, उस्मानाबाद या जिल्ह्यांतून फिरणार आहे. डीवायएफआयचे राज्याध्यक्ष सुनील धानवा व एसएफआयचे राज्याध्यक्ष मोहन जाधव हे संबंधित जत्थ्याचे नेतृत्व करतील, तर डीवायएफआयचे राज्य कमिटी सदस्य कृणाल सावंत व एसएफआय राज्य कमिटी सदस्य राहुल खंडाळकर यांच्या नेतृत्त्वाखाली नागपूर येथून सुरू होणारा जत्था संपूर्ण विदर्भात फिरणार आहे. रविवारी या सर्व जत्थ्यांची सुरूवात झाली असून, या ३ प्रमुख जत्थ्यांसह आणखी ३ उपजत्थे सोलापूर येथील ११ फेब्रुवारीला होणाºया जाहीर सभेत येऊन धडकतील.
सत्तेवर येण्याआधी सरकारने दिलेल्या शिक्षणाची संधी आणि रोजगाराचे काय झाले? या प्रश्नावर जत्थ्यांमधून जाब विचारला जाईल. नोकर भरतीवरील बंदी उठविण्याची मागणी करत, नवउदारवादी धोरणांचा निषेधही जत्थ्यांमध्ये केला जाणार आहे. दरवर्षी २ कोटी रोजगार देण्याचे आश्वासन सरकारने दिले होते. मात्र, दरवर्षी बेरोजगारांची संख्या लाखांवर वाढत असल्याचा आरोप करत, विद्यार्थी व युवकांमध्ये जाणीव जागृती घडविण्याचे काम जत्थ्याच्या माध्यमातून केला जाईल, अशी माहिती प्रीती शेखर यांनी दिली.

Web Title: Jagar Sangat on education, unemployment issues!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.