Join us

जय महाराष्ट्र... निर्भय समर्थनाबद्दल उर्मिलांकडून राज ठाकरेंचे 'मनसे' आभार

By ऑनलाइन लोकमत | Published: April 30, 2019 10:06 PM

काँग्रेसच्या लोकसभा उमेदवार उर्मिला मांतोडकर यांनी राज ठाकरेंच्या सभांचे कौतुक केले होते

लोकसभा निवडणुकांमध्ये काँग्रेसतर्फे निवडणूक लढविणारी अभिनेत्री उर्मिला मांतोडकर यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि मनसे कार्यकर्त्यांचे आभार मानले आहेत. राज ठाकरेंच्या भाजपाविरोधी भूमिकेचं कौतुक करत उर्मिला यांनी निर्भय समर्थन दिल्याबद्दल राज यांना धन्यवाद दिले. तसेच, राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनीही मतदारसंघात घेतेल्या सभेसाठी उर्मिला यांनी त्याचेही आभार मानले आहेत. 

काँग्रेसच्या लोकसभा उमेदवार उर्मिला मांतोडकर यांनी राज ठाकरेंच्या सभांचे कौतुक केले होते. तसेच, राजसाहेबांनी माझ्या मतदारसंघात सभा घेतल्यास मला आनंदच होईल. राज ठाकरेंची सभा नकोय, असं कुणाला वाटंल? असे म्हणत उर्मिला मांतोडकर यांनी राज ठाकरेंच्या सभेसाठी अप्रत्यक्षपणे आर्जवही केलं होते. त्या पार्श्वभूमिवर मनसेच्या कार्यकर्त्यांनी मराठी उमेदवार आणि भाजपाविरोधी भूमिका घेत उर्मिला मांतोडकर यांना निवडणूक काळात अप्रत्यक्षपणे मदत केली. राज ठाकरेंसह मनसेचे नयन कदम, हेमंत कांबळे, विलास मोरे, राजेश अरुणकर, प्रसाद कुलबकर, सुशांत माळवदे आणि संपूर्ण मोहिमेत जीव ओतणाऱ्या मनसे कार्यकर्त्यांचे उर्मिला यांनी आभार मानले.  

लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आपला एकही उमेदवार उभा केला नाही. मात्र, मनसेच्या या भूमिकेमुळे सत्ताधारी भाजप आणि शिवसेनेचे झोप उडाली आहे. 2014 च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींना पाठिंबा दर्शविणाऱ्या राज ठाकरे यांनी यावेळी मोदींना रोखण्यासाठी दंड थोपटले होते. तसेच भाजपला पाडण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या पक्षांना मदत करण्याचा निश्चय केला होता. याचा फायदा सहाजिकच काँग्रेस आणि राष्ट्रवादीला झाला. त्यामुळे उत्तर मुंबई मतदारसंघातून काँग्रेस तिकीटावर निवडणूक लढविणाऱ्या उर्मिला मांतोडकर यांनाही याचा फायदा झाला. उर्मिला यांच्याविरुद्ध गोपाळी शेट्टी हे परप्रांतीय नेते होते. त्यामुळे मराठीच्या मुद्द्यावरुन राजकारण करणाऱ्या मनसे कार्यकर्त्यांनी यंदा मराठी उमेदवाराला साथ द्या.. म्हणत लोकसभा निवडणूकीत उघडपणे उर्मिला यांच्या प्रचारासाठी बाजी लावल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे उर्मिला यांनी राज ठाकरेंचे आभार मानले आहेत. तसेच, शरद पवार आणि मिलिंद देवरा यांनाही धन्यवाद दिले आहे. 

 

टॅग्स :मनसेराज ठाकरेउर्मिला मातोंडकरकाँग्रेसमहाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019मुंबई