बाळासाहेब ठाकरेंच्या संपत्तीचा मालक ठरला, उद्धव आणि जयदेव यांच्यातील वाद मिटला

By ऑनलाइन लोकमत | Published: November 2, 2018 11:59 AM2018-11-02T11:59:38+5:302018-11-02T12:19:05+5:30

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या संपत्तीवरून जयदेव ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या वाद उफाळून आला होता.

Jaidev Thackeray pil back of father Bal Thackeray's property issue | बाळासाहेब ठाकरेंच्या संपत्तीचा मालक ठरला, उद्धव आणि जयदेव यांच्यातील वाद मिटला

बाळासाहेब ठाकरेंच्या संपत्तीचा मालक ठरला, उद्धव आणि जयदेव यांच्यातील वाद मिटला

googlenewsNext

मुंबई- शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या संपत्तीवरून जयदेव ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यात वाद उफाळून आला होता. त्यानंतर हा वाद मुंबई हायकोर्टातही गेला. पुत्र जयदेव ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या मृत्युपत्रातील मजकुराबद्दल संशय व्यक्त केला होता. त्यानंतर न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी सुरू होती. या प्रकरणात जयदेव ठाकरे यांनी दावा मागे घेतला आहे. त्यामुळे बाळासाहेब ठाकरेंच्या संपत्तीची मालकी उद्धव ठाकरेंना मिळाली आहे. खटला आणखी पुढे नेण्याची इच्छा नसल्याचं सांगत जयदेव ठाकरे यांनी याचिका मागे घेतली आहे. 

17 नोव्हेंबर 2012 रोजी बाळासाहेब ठाकरेंचे निधन झाले. त्यांचे मृत्यूपत्र प्रमाणित करून घेण्यासाठी उद्धव यांनी उच्च न्यायालयात अर्ज केला. त्यावर जयदेव यांनी आक्षेप घेतल्याने सध्या याबाबत कायदेशीर वाद सुरू झाला होता. हे मृत्यूपत्र तयार करताना बाळासाहेबांची प्रकृती खालावलेली होती. त्यांची दिशाभूल करून हे मृत्यूपत्र तयार करण्यात आले होते. मृत्यूपत्र प्रामणित करून घेण्यासाठी उद्धव हे न्यायालयात अर्ज करू शकत नाही, असा दावा जयदेव यांनी केला होता. परंतु मृत्युपत्राला आव्हान देणारी याचिका मागे घेत जयदेव ठाकरेंनी बाळासाहेब ठाकरेंची संपत्ती उद्धव ठाकरेंना मिळण्याचा मार्ग मोकळा करून दिला. त्यामुळे या दोन्ही बंधूंमधील वाद लवकरच संपुष्टात येतील, अशी आशा व्यक्त केली जात आहे.    

Web Title: Jaidev Thackeray pil back of father Bal Thackeray's property issue

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.