कनिष्ठ शिक्षकांचे उद्या जेल भरो आंदोलन

By admin | Published: January 11, 2017 06:44 AM2017-01-11T06:44:08+5:302017-01-11T06:44:08+5:30

कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षकांच्या सरकारने मंजूर केलेल्या मागण्यांची अंमलबजावणी होत नसल्याचा आरोप करत मुंबई

Jail Bharo Movement of junior teachers tomorrow | कनिष्ठ शिक्षकांचे उद्या जेल भरो आंदोलन

कनिष्ठ शिक्षकांचे उद्या जेल भरो आंदोलन

Next

मुंबई : कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षकांच्या सरकारने मंजूर केलेल्या मागण्यांची अंमलबजावणी होत नसल्याचा आरोप करत मुंबई विभागीय कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेने गुरुवारी जेल भरो आंदोलनाची हाक दिलेली आहे. गेल्या पाच वर्षांपासून कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांच्या विविध मागण्या प्रलंबित असून नव्या समस्या निर्माण होत असल्याने नाइलाजास्तव जेल भरो करत असल्याचे संघटनेने स्पष्ट केले.
संघटनेचे सरचिटणीस अनिल देशमुख यांनी सांगितले की, आॅनलाइन संच मान्यतेतील त्रुटी दूर करण्याचे आश्वासन सरकारने दिलेले होते. मात्र तसे झाले नाही. याउलट शिक्षण सेवक कालावधी संपलेल्यांना सेवा सातत्य नाकारण्यात येत आहे. त्यामुळे शेकडो शिक्षण सेवकांवर उपासमारीची वेळ आलेली आहे.
गेल्या पाच वर्षांपासून शिक्षकांच्या विविध मागण्या सरकार दरबारी प्रलंबित आहेत. त्यासाठी संघटनेने शिक्षण उपसंचालकांना घेराव घालण्यापासून धरणे आणि इशारा आंदोलने केली. त्याची दखल घेत सरकारने केवळ बैठकांचे आश्वासन दिले. याउलट प्रत्यक्षात मंजूर केलेल्या मागण्यांची अंमलबजावणी झाली नाही. त्यामुळे शिक्षकांची फसवणूक केल्याप्रकरणी सरकारविरोधात जेल भरो आंदोलन करत असल्याचे देशमुख यांनी सांगितले.
सरकारने जेल भरो आंदोलनाची गंभीरतेने दखल घेतली नाही, तर संघटनेकडून बारावी बोर्डाच्या परीक्षेवेळी राज्यभरात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. शिवाय आश्वासनांची पूर्तता न केल्यामुळे या आंदोलनाची सर्वस्वी जबाबदारी सरकारची राहील, असेही देशमुख यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)

काय आहेत मागण्या

च्प्रचलित निकषांनुसार संच मान्यता करण्यात यावी.
च्कालावधी संपलेल्या शिक्षण सेवकांना तत्काळ सेवा सातत्य द्यावे.
च्माहिती तंत्रज्ञान विषय अनुदानित करून त्यावरील शिक्षकांना नियुक्ती मान्यता व वेतन द्यावे.

Web Title: Jail Bharo Movement of junior teachers tomorrow

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.