निलेश राणेंच्या विरोधात 'जेल भरो' आंदोलन, राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना अटक!

By मनोहर कुंभेजकर | Published: June 9, 2023 06:05 PM2023-06-09T18:05:35+5:302023-06-09T18:07:29+5:30

शेकडो कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक केली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना आझाद मैदानातून पोलीस व्हॅनमध्ये बसवून यलो गेट पोलीस ठाण्यात नेण्यात आले.

'Jail Bharo' protest against Nilesh Rane, NCP workers arrested! | निलेश राणेंच्या विरोधात 'जेल भरो' आंदोलन, राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना अटक!

निलेश राणेंच्या विरोधात 'जेल भरो' आंदोलन, राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना अटक!

googlenewsNext

मुंबई : माजी खासदार निलेश राणे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याविरोधात बदनामीकारक ट्विट केल्याच्या निषेधार्थ आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या शेकडो कार्यकर्त्यांनी आझाद मैदानात जेल भरो आंदोलन केले. यावेळी मुंबई विभागीय राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष नरेंद्र राणे, राखी जाधव व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश प्रवक्ते अॅड.अमोल मातेले यांच्यासह सर्व जिल्हाध्यक्ष, युवक व महिला यांच्यातर्फे मुंबई 'जेल भरो' आंदोलन करण्यात आले.

यावेळी शेकडो कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक केली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना आझाद मैदानातून पोलीस व्हॅनमध्ये बसवून यलो गेट पोलीस ठाण्यात नेण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेसने भाजप नेते आणि माजी खासदार निलेश राणे याच्यावर कठोर कारवाईची मागणी केली.युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख,महिला अध्यक्षा सुरेखा पेडणेकर, ओबीसी कार्याध्यक्ष राज राजापूरकर, दक्षिण मुंबई जिल्हाध्यक्ष महेंद्र पानसरे , प्रशांत पाटील, आरती साळवी, भावना घाणेकर, प्रमोद पाटील यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक केली.
 

Web Title: 'Jail Bharo' protest against Nilesh Rane, NCP workers arrested!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.