- मनोहर कुंभेजकरमुंबई -डेंजरस बीच म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मालाडच्या अकसा बीच वर जेलिफिशची दहशत सुरूच आहे.सकाळपासून 4 पर्यटकांना जेलिफिशन डंख मारले आहेत.काल दिवसभरात 50 पर्यटकांना अकसा बीचवर जेलिफिशने डंख मारला होता.सदर वृत्त सर्वप्रथम लोकमतने ऑनलाईन दिल्यावर सदर वृत्त सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाले होते. आजच्या लोकमतच्या अंकात देखिल सदर सविस्तर वृत्त दिल्यावर त्यांचे सकारात्मक पडसाद उमटले.लोकमत ऑनलाईनची बातमीची तातडीने दखल घेऊन मुंबईचे प्रथम नागरिक असलेले महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी पालिका आयुक्तांनी यावर प्रभावी उपाययोजना करावी असे आवाहन केले आहे.
दर रविवारी सुमारे 5000 हुन अधिक पर्यटक अकसा बीचवर येतात.आज सकाळ पासूनच येथे पर्यटक येण्यास सुरुवात झाली.सकाळी समुद्राला भरती होती.पाण्यात जाऊ नका असे आवाहन आम्ही नागरिकांना सतत करत आहोत.मात्र पर्यटक आमचे व फायर ब्रिगेडच्या जवानांचे ऐकत नाही.त्यामुळे पाण्यात गेलेल्या 4 पर्यटकांना जेलिफिशने डंख मारले असल्याची माहिती येथील जीवरक्षक नथुराम सूर्यवंशी यांनी दिली. सकाळच्या शिफ्ट मध्ये 2 जीवरक्षक ,1 फायरब्रिगेडचा अधिकारी 2 जवान बीचवर नागरिकांनी पाण्यात जाऊ नये म्हणून शिट्टी मारून आणि ओरडून सांगत होतो,तर आम्ही जेली फिश हातात व डब्यात घेऊन पर्यटकांना याची माहिती देत होतो अशी माहिती जीवरक्षक सूर्यवंशी यांनी लोकमतला दिली.आज रविवार सुट्टी असल्याने दुपारी 3 नंतर मोठ्या प्रमाणात पर्यटक येथे येतात,त्यामुळे महानगर पालिका व फायर ब्रिगेडची यावेळी कसोटी असून जेलिफिशच्या दहशतीच्या धर्तीवर जेलीफिशचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी अतिरिक्त पोलिस यंत्रणा येथे तैनात केली पाहिजे आणि अकसा बीच निर्मनुष्य केला पाहिजे असे मत महाराष्ट्र मच्छिमार कृती समितीचे सरचिटणीस किरण कोळी यांनी लोकमतशी बोलतांना केली.