Join us

ठाण्यात एकता मंडळाचा जयपूर पॅलेस

By admin | Published: September 03, 2014 11:17 PM

जवाहरनगरच्या एकता मित्र मंडळाने राजस्थानचा जयपूर पॅलेस उभारुन त्यामध्ये भव्य दहा फूटी गणोश मूर्तीची प्रतिष्ठापना केली आहे.

जितेंद्र कालेकर - ठाणो
जवाहरनगरच्या एकता मित्र मंडळाने राजस्थानचा जयपूर पॅलेस उभारुन त्यामध्ये भव्य दहा फूटी गणोश मूर्तीची प्रतिष्ठापना केली आहे. या मूर्तीच्या चेह:यावरील भाव इतके बोलके 
आहेत की, लांबूनही या रस्त्यावरुन जाणारे भाविक गणोशाचे दर्शन घेतल्याशिवाय पुढे जात नाहीत. 
राग रुसवा नको म्हणून एकाही राजकीय नेत्याकडून देणगी घेतली 
जात नाही. अर्थात, त्यांना दर्शनासाठी मात्र न विसरता बोलावून उत्सव साजरे करणारे हे मंडळ काहीसे विरळेच. 
गांधीनगरपासून खेवरासर्कलकडे जाणा:या रस्त्याच्या सुरुवातीलाच जवाहरनगरच्या या गणोशाचे दर्शन होते. एकता मित्र मंडळाच्या नावाने गेल्या 3क् वर्षापासून आणि त्या आधी युवा मित्र मंडळाच्या नावाने सुरु असलेल्या या मंडळाला आता 5क् वर्ष पूर्ण झाली आहेत. भव्य आणि आकर्षक देखणी दहा फूट मूर्ती हे वैशिष्टय यंदाही मंडळाने कायम ठेवले आहे. एकता नावाला जागून मंडळाच्या कार्यकत्र्यानी एकदिलाने काम करुन यंदा बाहेरील कोणताही आर्टीस्ट न आणता जयपूर पॅलेस साकारला आहे. मंडळाच्या 25 ते 3क् कार्यकत्र्यानी नोकरी धंदा सांभाळून रात्रीचे तीन ते चार तास काम करुन अवघ्या 15 दिवसातच हा पॅलेस उभा केला आहे. भव्यता, सुबकता आणि फ्लोरोसेंन्ट रंगांमुळे ही मूर्ती आणखी  तेजस्वी वाटते. त्यामुळेच पोखरणचा राजा म्हणून नावारुपाला आलेल्या या गणोशाचे नावही सार्थकी वाटते. मूर्तीवरील अॅन्टीक ज्वेलरीमुळे तर तिचे सर्वागी सुंदर रुप मनमोहक दिसते.
 
या गणोशाचे विसर्जन कोलशेतच्या खाडीत होते. जवाहरनगर ते कोलशेत या दरम्यानच्या मिरवणूकीत कोठेही गुलाल उधळला जात नाही. त्याऐवजी पुष्पवृष्टी केली जाते. गुलालामुळे अनेकदा डोळयांना इजा होत असल्याने त्याचा वापर कटाक्षाने टाळता येत असल्याचे मंडळाने सांगितले. देणगीच्या रक्कमेतून पंचकुंडी यज्ञ, सांस्कृतिक कार्यक्रम, मिरवणूक आदींवर खर्च केला जातो.
 
राजकीय पक्षाचा निधी नाही
कोणत्याही एखाद्या पक्षाचा निधी किंवा देणगी घेतली तर दुस:याकडून राग रुसवा नको म्हणून कोणत्याच राजकीय नेत्याकडून गेल्या आठ ते दहा वर्षापासून देणगी स्विकारली जात नाही.त्यामुळे कोणत्याही पक्षाचे याठिकाणी बॅनर किंवा शुभेच्छा जाहिरातीही लावल्या जात नाहीत. मात्र, कोणत्याही पक्षाचे वैर नसल्याने नेते आणि पदाधिका:यांना आवजरून निमंत्रण देऊन पूजा आणि गणोश दर्शनाला पाचारण करण्यात येत असल्याचे मंडळाचे कार्यकर्ते सांगतात.