मुंबई : पश्चिम रेल्वे मार्गावरील मुंबई सेंट्रल स्थानकाजवळील यार्डमध्ये असलेल्या जयपूर सुपर फास्ट एक्स्प्रेसच्या एका डब्याला बुधवारी सायंकाळी ६च्या सुमारास आग लागली. जयपूर सुपरफास्ट एक्स्प्रेस यार्डमध्ये उभी होती. त्यामुळे सर्व डबे रिकामी होते. त्यामुळे कोणतीही जीवितहानी या घटनेत झाली नाही. मात्र, आगीचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
१२९५५ जयपूर सुपरफास्ट एक्स्प्रेस बुधवारी यार्डमध्ये उभी होती. या एक्स्प्रेसच्या तृतीय श्रेणीच्या एसी डब्यातून धूर येत होता. अचानक या धुराचे प्रमाण वाढून मोठी आग लागली. सायंकाळी ६.३०च्या सुमारास आग विझविण्यात आली. या डब्याला जोडून असलेला द्वितीय श्रेणीचा डबा सुरक्षित असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली आहे. या दुर्घटनेमुळे या गाडीच्या वेळेत बदल करण्यात आला असून दुसरा डबा जोडून रात्री ८.५०च्या सुमारास एक्स्प्रेस जयपूरकडे रवाना झाली.उच्चस्तरीत समितीद्वारे होणार चौकशीजयपूर सुपरफास्ट एक्स्प्रेसच्या रिकाम्या डब्याला आग कशामुळे लागली, याची चौकशी करण्यात येईल. यासाठी पश्चिम रेल्वे प्रशासनाने उच्चस्तरीय समितीची स्थापना केली आहे. यामध्ये सुरक्षा, यांत्रिक आणि विद्युत विभागातील प्रत्येकी एक अधिकारी अशा एकूण चार अधिकाऱ्यांचा समावेश आहे.