झायरा वसीमसोबत झालेला प्रकार लाजिरवाणा - विजया रहाटकर 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 10, 2017 10:06 AM2017-12-10T10:06:57+5:302017-12-10T10:12:00+5:30

अभिनेत्री झायरा वसीमसोबत विमानात झालेला छेडछाडीचा प्रकार लाजिरवाणा आहे, अशी प्रतिक्रिया महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी दिली आहे

Jaira Vaseem is the type of Lajirwana - Vijaya Rahatkar | झायरा वसीमसोबत झालेला प्रकार लाजिरवाणा - विजया रहाटकर 

झायरा वसीमसोबत झालेला प्रकार लाजिरवाणा - विजया रहाटकर 

Next

मुंबई - अभिनेत्री झायरा वसीमसोबत विमानात झालेला छेडछाडीचा प्रकार लाजिरवाणा आहे, अशी प्रतिक्रिया महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी दिली आहे. यावेळी त्या म्हणाल्या की, DGCA ने याबाबत चौकशी करावी यासाठी राज्य महिला आयोग योग्य ती पावले उचलेल. 

याप्रकरणावर बोलताना विजया रहाटकर म्हणाल्या की, मुंबई पोलिसांनी यात तातडीने लक्ष घालावे असे निर्देश देण्यात आले आहेत. एअर लाईन्सने याबाबत काय कारवाई केली याची चौकशी केली जाईल. त्याचप्रमाणे केबिन क्रुने झायराला सहकार्य केले नाही याबाबत ही चौकशी व्हावी. पुढे बोलताना त्या म्हणाल्या की, सहप्रवाशांनी मदत न करणे हे खेदजनक आहे. महाराष्ट्र राज्य महिला आयोग झायरा सोबत आहे.

आज सकाळी झायरानं इनस्टाग्राम पोस्टद्वारे तिच्यासोबत विमानात झालेल्या छेडछाडीबद्दल माहिती दिली. झायरा काल नवी दिल्ली ते मुंबई असा विस्तार एअरलाइनन्सने प्रवास करत असताना तिच्यासोबत एका सहप्रवाशानं असभ्य वर्तन केलं.  झायरानं असा आरोप केला आहे की, नवी दिल्ली-मुंबई प्रवास करत असताना तिच्या पाठीमागील सीटवर बसलेल्या एका प्रवाशानं तिच्यासोबत असभ्य वर्तन केलं. झायरानं याबाबत विमानातील क्रू कडे तक्रार केली. मात्र, फ्लाइट क्रूने तिची कोणतीही मदत केली नाही.  मुलींची तुम्ही अशी काळजी घेणार का? असा प्रश्न उपस्थित करताना तिला अश्रू अनावर झाले. संबंधित प्रवाशावर आता कोणती कारवाई होणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. 

काय आहे प्रकरण - 
झायरानं फ्लाइटमध्ये असतानाच याबाबत एक इनस्टाग्राम पोस्ट केली होती. त्यामध्ये तीनं असे म्हटलं होतं,  माझ्या मागील सीटवर बसलेला एक वयस्कर वयाचा व्यक्ती फ्लाइटमधील कमी लाईट फायदा घेत माझ्यशी असभ्य वर्तन करत आहे. ती व्यक्ती पायानं माझ्या मानेला आणि पाठीला घासत आहे. मी त्याला विरोध केला. त्याला गोंधळ करण्याची धमकी दिली. तरीही त्याच्या वागण्यात कोणताही बदल झाला नाही.  मी फ्लाइटमध्ये या सर्व गोष्टीचा व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न केला. मात्र लाइट कमी असल्यामुळे ते शक्य झालं नाही.  

मुंबईत पोहचल्यावरनंतर लाईव्ह व्हिडिओ - 
झायरानं मुंबईमध्ये पोहचल्यानंतर आपल्या इनस्टाग्रामद्वारे लाईव्ह येतं आपल्या भावना व्यक्त केल्या. यावेळी ती स्वताचे आश्रू रोखू शकली नाही. स्वतसोबत झालेल्या असभ्य वर्तनाबाबत माहिती देताना तिला रडू कोसळलं. यावेळी ती म्हणाली की विमानात येवढे सर्वजण असताना एकजणही माझ्या मदतीला आलं नाही. 

Web Title: Jaira Vaseem is the type of Lajirwana - Vijaya Rahatkar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.