Join us

पिक्चर अभी बाकी है; जैश-उल-हिंदनं स्वीकारली अंबानींच्या घराबाहेरील स्फोटकांच्या गाडीची जबाबदारी

By ऑनलाइन लोकमत | Published: February 28, 2021 10:05 AM

Jaish Ul Hind Claims Responsibility Of Placing Explosive Near Mukesh Ambani: मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर आढळून आली होती स्फोटकांनी भरलेली कार; मुंबई पोलीस, एनआयएकडून तपास सुरू

मुंबई: उद्योगपती मुकेश अंबानींच्या (Mukesh Ambani) घराबाहेर दोनच दिवसांपूर्वी स्फोटकांनी भरलेली कार आढळून आली होती. याची जबाबदारी जैश-उल-हिंदनं स्वीकारली आहे. स्फोटकांनी भरलेली कार आपणच ठेवली असल्याचा दावा करत पिक्चर अभी बाकी है, असा इशारादेखील जैश-उल-हिंद या दहशतवादी संघटनेनं दिला आहे. या प्रकरणाचा तपास सध्या राष्ट्रीय तपास यंत्रणा आणि मुंबई पोलिसांची गुन्हे शाखा करत आहे. (Jaish Ul Hind Claims Responsibility Of Placing Explosive Near Mukesh Ambani House)अंबानींच्या निवासस्थानाबाहेर पार्क केलेली स्कॉर्पिओ चोरीची; उड्डाणपुलाखालून पळविल्याचे उघडएसयूव्हीमध्ये स्फोटकं ठेवणारे दहशतवादी सुरक्षितरित्या घरी पोहोचले असा दावा जैश-ए-हिंदनं टेलिग्राम मेसेजमधून केला आहे. 'हा केवळ एक ट्रेलर होता. पूर्ण चित्रपट अद्याप बाकी आहे,' असं जैश-ए-हिंदनं मेसेजमध्ये म्हटलं आहे. मेसेजमधून अंबानी यांच्याकडे पैशांची मागणी करण्यात आली आहे. अंबानींनी मागणी पूर्ण न केल्यास त्यांच्या मुलाच्या कारवर हल्ला करण्यात येईल, अशी धमकी जैशनं दिली आहे. 'तुम्हाला काय करायचंय, याची कल्पना तुम्हाला आहे. तुम्हाला सांगितलेली रक्कम आम्हाला पाठवा आणि तुमच्या 'फॅट किड्स'सोबत आनंदानं राहा,' असं मेसेजमध्ये पुढे नमूद करण्यात आलं आहे.२ तास गाडीतच बसून होता आरोपी; सीसीटीव्हीत न दिसण्यासाठी लढवली 'ही' शक्कलदोन दिवसांपूर्वी मुकेश अंबानींच्या घराबाहेर स्फोटकांनी भरलेली एक एसयूव्ही आढळून आली. मुंबई पोलिसांची गुन्हे शाखा आणि राष्ट्रीय तपास यंत्रणा (एनआयए) संयुक्तपणे या प्रकरणाचा तपास करत आहेत. या प्रकरणात दहशतवादी संघटनेचा हात असण्याची शक्यता पोलिसांनी आधीच वर्तवली होती. मात्र तेव्हा कोणत्याही संघटनेनं जबाबदारी स्वीकारली नव्हती. परिसरातील सीसीटीव्हीत एक संशयित व्यक्ती कार पार्क करताना दिसून आला आहे. त्याच्या चेहऱ्यावर मास्क आहे. या व्यक्तीचा शोध सध्या सुरू आहे.We are Thankful... अंबानींच्या घरासमोरची स्फोटकांनी भरलेली कार शोधणाऱ्या पोलिसांचे रिलायन्सकडून आभारपोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार, अंबानींच्या घराबाहेर आढळून आलेल्या स्कॉर्पियो गाडीतील जिलेटिनच्या काड्या नागपूरमधील कंपनीनं तयार केल्या आहेत. पोलिसांनी या कंपनीकडून याबद्दलची माहिती घेतली आहे. कारमध्ये आढळून आलेलं धमकीचं पत्र गुजराती भाषेत आहे. तर जैशनं जबाबदारी स्वीकारण्यासाठी केलेला टेलिग्राम मेसेज इंग्रजीत आहे.

टॅग्स :मुकेश अंबानीराष्ट्रीय तपास यंत्रणामुंबई पोलीस