जीवलगांच्या स्मृती अजरामर करा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2017 01:14 AM2017-07-31T01:14:47+5:302017-07-31T01:14:47+5:30

शवविच्छेदनगृहात आणलेल्या देहाचे अवयवदान वा देहदान शक्य नसते; मात्र नेत्रदान, त्वचादान नक्की करता येते हे बºयाच जणांना माहीत नसते.

jaivalagaancayaa-samartai-ajaraamara-karaa | जीवलगांच्या स्मृती अजरामर करा!

जीवलगांच्या स्मृती अजरामर करा!

Next

मुंबई : शवविच्छेदनगृहात आणलेल्या देहाचे अवयवदान वा देहदान शक्य नसते; मात्र नेत्रदान, त्वचादान नक्की करता येते हे बºयाच जणांना माहीत नसते. आपल्या जीवलगाच्या आकस्मिक निधनाने बसलेल्या धक्क्याने सर्व नातेवाईक कमालीचे शोकमग्न असतात. अशा दु:खाच्या प्रसंगी प्रभावी समुपदेशन फलकाने ‘याही परिस्थितीत आपण आपल्या जीवलगांच्या स्मृती अजरामर करू शकतो’ हा विचार नातेवाइकांच्या मनात यावा या विचाराने गोरेगावमध्ये शनिवारी पथदर्शी प्रकल्पाचा श्रीगणेशा करण्यात आला.
राजहंस प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित करण्यात आलेला हा प्रकल्प राज्य शासनाच्या ‘महाअवयवदान अभियानां’तर्गत राबविण्यात येणार आहे. गोरेगाव सिद्धार्थ रुग्णालयातील शवविच्छेदन केंद्र येथे पार पडलेल्या या कार्यक्रमात अवयवदान चळवळीचे प्रणेते (श्रीकांत आपटे) आपटे काका आणि काकू उपस्थित होते. फलकांचे अनावरण परिमंडळ ११ चे पोलीस उपायुक्त विक्रम देशमाने, परिमंडळ १२ चे डॉ. विनयकुमार राठोड, सिद्धार्थ शवविच्छेदन केंद्राचे प्रभारी वैद्यकीय अधिकारी डॉ. भाले पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. या पथदर्शी प्रकल्पासाठी राजहंस प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुहास कबरे यांचेही सहकार्य लाभले आहे.
नेत्रदान, त्वचादान करायचे ठरवले तर पोलीस, शवविच्छेदन आणि शल्यचिकित्सक परवानगी देतील काय, त्यासाठी काय कार्यपद्धती असते, कोण मार्गदर्शन करेल, जबाबदारी कोण घेईल अशा एक ना अनेक प्रश्नांची नातेवाइकांच्या मनात भीती असते. मात्र यावर तोडगा म्हणून आपटे काकांशी संपर्क करण्याचे आवाहनही या ठिकाणी करण्यात आले. स्वत: उपस्थित राहून सर्व शंकांचे निरसन करेन आणि सर्व प्रक्रिया पार पडण्याची जबाबदारी घेईन, असे आपटे काका यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. या प्रकल्पामुळे निश्चितच आपल्या जीवलगांच्या स्मृती अजरामर राहतील, असा विश्वास काकांनी व्यक्त केला.

Web Title: jaivalagaancayaa-samartai-ajaraamara-karaa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.