Join us

जळगाव ४१.४ अंश आणि मुंबई ३४.८

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2020 7:36 PM

जळगाव येथे ४१.१ अंश सेल्सिअस एवढया कमाल तापमानाची नोंद झाली आहे. तर मुंबईचे कमाल तापमान ३४.८ अंश नोंदविण्यात आले आहे.

मुंबई : गेल्या २४ तासांत राज्यात तुरळक ठिकाणी पावसाची नोंद झाली असून, १२ एप्रिल रोजी मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात पाऊस पडेल, अशी शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. एकीकडे अवेळी पावसाने धिंगाणा घातला असतानाच दुसरीकडे मात्र ऊन्हाने कहर केला आहे. शनिवारी बहुतांश ठिकाणी कमाल तापमान ३९ अंशाच्या घरात नोंदविण्यात आले असून, जळगाव येथे ४१.१ अंश सेल्सिअस एवढया कमाल तापमानाची नोंद झाली आहे. तर मुंबईचे कमाल तापमान ३४.८ अंश नोंदविण्यात आले आहे.

हवामान खात्याकडून मिळालेल्या माहितीनुसार, संपुर्ण राज्यात कमाल तापमान सरासरीच्या जवळपास नोंदविण्यात आले आहे. विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील बहुतांशी शहरांचे कमाल तापमान ३५ अंशाच्या आसपास आहे. मराठवाड्यात अधिकाधिक कमाल तापमानाची नोंद होत आहे. यापूर्वी मालेगाव, सोलापूर येथे कमाल तापमान सातत्याने ४० अंश नोंदविण्यात येत असून, मालेगाव येथे ४१ अंश एवढया कमाल तापमानाची नोंद झाली आहे. मुंबईचा विचार करता येथील कमाल तापमान अद्यापही ३४ अंशाच्या घरात नोंदविण्यात येत आहे. कमाल तापमानाचा पारा स्थिर असून, ऊन्हानेही अद्याप म्हणावा तसा जोर पकडलेला नाही. दुसरीकडे मुंबईकरांना दिलासादायक बातमी म्हणजे कोरोनाला थोपविण्यासाठी लागू करण्यात आलेल्या लॉक डाऊनमुळे मुंबईच्या प्रदूषणात सातत्याने चांगलीच घट नोंदविण्यात येत आहे. दरम्यान, पुणे, अहमदनगर, सातारा, सांगली आणि सिंधूदुर्ग या जिल्हयांना पावसाचा इशारा देण्यात येत असून, गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ येथेही तुरळक ठिकाणी पावसाच्या नोंदीत वाढ होत असून, हवामानातील हे बदल कायम राहील, असा अंदाज खात्याने बांधला आहे.------------------------------

जळगाव ४१.४परभणी ४०जेऊर ४०नाशिक ३९.१सोलापूर ३९.४पुणे ३८.४सातारा ३८.२सांगली ३७.२मुंबई ३४.८

टॅग्स :उष्माघातमुंबईआरोग्य