जमात ए इस्लामी तर्फे राज्यभरात गरजूंना 1 कोटी 34 लाखांची मदत वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2020 06:35 PM2020-04-05T18:35:57+5:302020-04-05T18:36:27+5:30
गरजू व्यक्तींना रेशन कीट, अन्नाची पाकिटे, औषधे व काही ठिकाणी रोख रक्कम देऊन जमात ए इस्लामी तर्फे सहाय्य केले जात आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबईः कोरोनामुळे लागू झालेल्या लॉकडाऊनमध्ये विविध ठिकाणी अडकलेले नागरिक, गरीब, गरजू व्यक्तींना रेशन कीट, अन्नाची पाकिटे, औषधे व काही ठिकाणी रोख रक्कम देऊन जमात ए इस्लामी तर्फे सहाय्य केले जात आहे. दररोज काम करुन पैसे कमावणाऱ्या व्यक्तींना या लॉकडाऊनमुळे पैसे मिळणे बंद झाले आहे त्यांना जीवनावश्यक वस्तु दिल्या जात आहेत.
राज्यात 22 मार्च ते 31 मार्च या कालावधीत जमात ने 20 हजार 953 जणांना रेशन कीट वितरीत केली. त्यासाठी 1 कोटी 13 लाख 14 हजार 635 रुपये खर्च करण्यात आले. 47 हजार 400 जणांना अन्न पाकिटे देण्यात आली त्याला 16 लाख 21 हजार 950 रुपये खर्च झाले. तर वैद्यकीय मदतीसाठी 564 जणांना रोख 5 लाख 33 हजार 850 रुपये अशा प्रकारे 1 कोटी 34 लाख 76 हजार 35 रुपयांचे विविध माध्यमातून सहाय्य करण्यात आले. जमातने वितरीत केलेल्या रेशन कीट मध्ये गहू, तांदूळ, साखर, चहापत्ती, विविध डाळी, बेसन, गोडेतेल, माचिस अशा वस्तुंचा समावेश आहे.