Join us  

नवीन टॅलेंटला संधी मिळणार, स्वप्न पूर्ण होणार; JNAA कॅस्केड 'आशाएं' च्या ६ व्या एडिशनची घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2024 6:52 PM

'आशाएं' ने वेगवेगळ्या पार्श्वभूमीतील मुलांमध्ये टॅलेंट जोपासण्याची आणि सर्वसमावेशकता वाढवण्याची आपली परंपरा सुरू ठेवली आहे.

जमनाबाई नरसी अल्यूमनी असोशिएनने (JNAA) अभिमानाने कॅस्केडच्या 'आशाएं' च्या ६ व्या एडिशनची घोषणा करत आहे, जो आतापर्यंतचा सर्वात प्रेरणादायी आणि प्रभावशाली कार्यक्रम असेल. २७ जुलै २०२४ रोजी, मुंबईतील एका प्रतिष्ठित ठिकाणी, 'आशाएं' ने वेगवेगळ्या पार्श्वभूमीतील मुलांमध्ये टॅलेंट जोपासण्याची आणि सर्वसमावेशकता वाढवण्याची आपली परंपरा सुरू ठेवली आहे.

मागील एडिशन्सच्या उत्तुंग यशावर आधारित, 'आशाएं' २०२४ मुंबई ते पालघरपर्यंत असलेल्या १६ विविध स्वयंसेवी संस्थांमधील ६०० हून अधिक मुलांसाठी आशेचा किरण असेल. JNAA च्या नेतृत्वाखालील हा उपक्रम कला, नृत्य, संगीत आणि क्रीडा यातील नवीन टॅलेंट दाखवण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देतो. तसेच विविध उपक्रमांमध्ये तुम्ही सहभागी होऊ शकता.

JNAA हे सुनिश्चित करतं की प्रत्येक मुलाला संपूर्ण कार्यक्रमात चांगलं वाटेल. उत्साह, कल्पकता, ऊर्जा, प्रोत्साहन आणि आनंदाने भरलेलं हे ठिकाण मुलाच्या कलागुणांना वाव देईल. यामध्ये सहभागी होणाऱ्या प्रत्येकालाच पुढे जाण्यासाठी प्रोत्साहन मिळेल. त्यांच्या क्षमतेवर त्यांचा विश्वास दृढ होईल आणि त्यांना मोठी स्वप्न, आकांक्षा बाळगण्याची प्रेरणा मिळेल.

कार्यक्रमाच्या दिवसापलीकडेही कायमस्वरूपी याचा प्रभाव पडावा हे 'आशाएं' चे उद्दिष्ट आहे. 'आशाएं' च्या पलीकडे असलेलं टॅलेंट जपण्यावर आमचा विश्वास आहे. विविध स्पर्धेतील विजेत्यांना पूर्ण अनुदानीत शिष्यवृत्ती मिळते, ज्यामुळे त्यांना त्यांची शैक्षणिक आणि कलात्मक आवड जोपासण्यासाठी सक्षम केलं जातं असं 'आशाएं'चे अध्यक्ष कनिष्क अजमेरा यांनी म्हटलं आहे.

सहभागी झालेल्या सर्व लोकांना एक चांगला अनुभव देण्यासाठी JNAA ने 'आशाएं' चं आयोजन केलं आहे. 'आशाएं' २०२४ जसजसा जवळ येत आहे, तसतसा उत्साह दिसून येत आहे. कुटुंबं, सपोर्टर्स आणि हितचिंतकांना 'आशाएं' च्या उत्साहात सहभागी होण्यासाठी आणि मुंबईच्या तरुणाईचं टॅलेंट, दृढनिश्चयाचे साक्षीदार होण्यासाठी आमंत्रित करत आहे. 

टॅग्स :मुंबई