जमनाबाई नरसी अल्यूमनी असोशिएनच्या कॅस्केडमधून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना मिळते सुवर्णसंधी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2024 03:11 PM2024-08-22T15:11:48+5:302024-08-22T15:43:53+5:30

२७ तारखेला यशस्वीपणे पार पडलेल्या 'आशाएं' च्या परिपूर्ण अनुभवाने या फेस्टची सुरुवात होते. मुंबई आणि आसपासच्या शाळेतील विद्यार्थ्यांना सांस्कृतिकदृष्ट्या एक चांगला अनुभव देण्यावर फोकस केला जातो.

Jamnabai Narsi Alumni Association's Cascade provides golden opportunities to students' talents | जमनाबाई नरसी अल्यूमनी असोशिएनच्या कॅस्केडमधून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना मिळते सुवर्णसंधी

जमनाबाई नरसी अल्यूमनी असोशिएनच्या कॅस्केडमधून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना मिळते सुवर्णसंधी

जमनाबाई नरसी अल्यूमनी असोशिएन (JNAA) ही भारतातील सर्वात मोठ्या माजी विद्यार्थी संस्थांपैकी एक आहे, ज्यांचं उद्दिष्ट विद्यार्थ्यांना ग्रॅज्युएशननंतरही अनेक वर्षे शाळेशी सतत जोडून ठेवण्यास मदत करणं हे आहे. JNAA भारतातील सर्वात मोठ्या कॅस्केड नावाच्या वार्षिक आंतर-शालेय सांस्कृतिक आणि क्रीडा महोत्साचं आयोजन करते. JNAA ७० पेक्षा अधिक इव्हेंट करतं, ज्यामध्ये वेगवेगळ्या संस्थांमधून आठ हजारांपेक्षा जास्त विद्यार्थी सहभागी होतात.

२७ तारखेला यशस्वीपणे पार पडलेल्या 'आशाएं' च्या परिपूर्ण अनुभवाने या फेस्टची सुरुवात झाली. मुंबई आणि आसपासच्या शाळेतील विद्यार्थ्यांना सांस्कृतिकदृष्ट्या एक चांगला अनुभव देण्यावर फोकस केला जातो. विद्यार्थ्यांचे टॅलेंट आणि कल्पकतेला सर्टिफिकेट आणि स्कॉलरशिप देऊन ते सपोर्ट करतात. देशभरातील विद्यार्थ्यांना एका समान व्यासपीठावर एकत्र आणणं हा कॅस्केडचा उद्देश आहे. त्यांना समृद्ध करणारा अनुभव तसेच एक संधी मिळेल जी ते आयुष्यभर जपतील.

इयत्ता पहिली ते बारावीपर्यंतचे विद्यार्थी त्यांच्यातील सुप्त गुण, कला, स्पोर्ट्स यातील कौशल्य दाखवतात. त्यासाठी विविध कार्यक्रमाचं आयोजन केलं जातं. विद्यार्थ्यांनी सहभाग घ्यावा, त्यांच्यातील आत्मविश्वास वाढावा. त्यांच्यातील टॅलेंटला संधी मिळावी हा कॅस्केडचा हेतू आहे. त्यासाठी अनेक प्रतिष्ठित आणि दिग्गज व्यक्तींना देखील जज म्हणून आमंत्रित केलं जातं. 

कॅस्केडची २९ वी एडिशन १० आणि ११ ऑगस्ट २०२४ रोजी आयोजित करण्यात आली होती. त्यात विद्यार्थ्यांनी आपलं टॅलेंट दाखवत बेस्ट दिलं. यंदा नऊ हजारांहून अधिक विद्यार्थ्यांनी सहभागी होऊन आपली कल्पकता, टीमवर्क आणि खिलाडूवृत्ती दाखवली. या महोत्सवात चित्तथरारक कामगिरीचा समावेश होता. यामध्ये अनेक शाळांनी उत्कृष्ट कामगिरी केली आहे.  

कॅस्केड 29 च्या शानदार यशाने आम्ही खूप रोमांचित आहोत आणि आम्ही सर्व सहभागींचे आभार मानत आहोत. आमच्या संपूर्ण टीममुळे हे शक्य झालं आहे असं कॅस्केडचे चेअरपर्सन कनिष्क अजमेरा यांनी म्हटलं आहे. विद्यार्थ्यांनी दाखवलेलं टॅलेंट खूपच प्रेरणादायी होतं. अशा कलागुणांना आम्ही संधी देतो याचा आम्हाला अभिमान आहे असंही सांगितलं. JNAA हे पुढील वर्षांमध्ये उत्कृष्टतेची परंपरा चालू ठेवण्यास उत्सुक आहे. 
 

Web Title: Jamnabai Narsi Alumni Association's Cascade provides golden opportunities to students' talents

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.