दिर्बादेवीच्या दर्शनासाठी जनसागर

By admin | Published: November 6, 2014 10:10 PM2014-11-06T22:10:08+5:302014-11-06T22:59:50+5:30

भाविकांची गर्दी : मुंबई, कोल्हापूरवासीयांचाही सहभाग

Janaragar for Darbadevi Darshan | दिर्बादेवीच्या दर्शनासाठी जनसागर

दिर्बादेवीच्या दर्शनासाठी जनसागर

Next

जामसंडे : जामसंडेमध्ये गुरुवारी श्री दिर्बादेवीच्या यात्रेसाठी भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शविली होती. गुरुवारी पहाटेपासूनच श्री दिर्बादेवी मंदिराचा परिसर भाविकांनी फुलून गेला होता. दिवसभरामध्ये हजारोंच्या संख्येने भाविकांनी दिर्बादेवी आणि श्री देव रामेश्वराचे दर्शन घेतले.
गुरुवारी पहाटेपासून श्री दिर्बादेवीच्या दर्शनास, नवस बोलणे, फेडणे यासह अन्य धार्मिक विधींना प्रारंभ झाला. यात्रेसाठी येणाऱ्या भाविकांची संख्या ही दिवसभर वाढतच गेली होती. यामध्ये मुंबई, कोल्हापूर यासह अन्य जिल्ह्यातील भाविकांनीही मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शविली होती. या निमित्ताने जामसंडे गावातील वातावरण भक्तीमय बनले होते.
यात्रेनिमित्त मंदिर परिसरामध्ये गृहोपयोगी वस्तू, खेळणी, खाद्यपदार्थ, कपडे यासह अन्य वस्तूंची दुकाने थाटण्यात आली होती. देवीच्या दर्शनानंतर भाविकांनी खरेदीकडे भर दिला होता. मंदिर परिसरातील रस्ते यानिमित्ताने सडारांगोळीने सजविण्यात आले होते. तसेच भाविकांच्या स्वागतासाठी कमानी उभारण्यात आल्या होत्या.
गुरुवारी दुपारपासून यात्रेसाठी येणाऱ्या भाविकांचा ओघ वाढत गेला तो शुक्रवारी पहाटेपर्यंत कायम राहणार आहे. भाविकांना योग्य आणि सुलभ दर्शन होण्यासाठी प्रशासनाने ग्रामस्थांना हाताशी धरून सुयोग्य नियोजन केले होते. त्यामुळे जत्रोत्सव सुरळीत पार पडला. (वार्ताहर)

प्रशासनाचे योग्य नियोजन
सर्व भाविकांना देवीचे दर्शन सुलभ व्हावे यासाठी पोलीस आणि स्थानिक ग्रामस्थ हे नियोजनबद्धरित्या कार्यरत होते. यानिमित्ताने मंदिर परिसर आकर्षक विद्युत रोषणाईने उजळून निघाला होता.

Web Title: Janaragar for Darbadevi Darshan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.