धुळीत हरवला जंजिरा किल्ला; पर्यटकांचीही पाठ

By admin | Published: April 6, 2015 10:38 PM2015-04-06T22:38:31+5:302015-04-06T22:38:31+5:30

मुरूड तालुक्यावर गेल्या दोन दिवसांपासून धुकेसदृश धुळीची चादर पसरलेली आहे. एकीकडे तापमान वाढत आहे, त्यात अचानक वातावरणात धुळीचे

Janjira fort destroyed in dust; Lessons for tourists | धुळीत हरवला जंजिरा किल्ला; पर्यटकांचीही पाठ

धुळीत हरवला जंजिरा किल्ला; पर्यटकांचीही पाठ

Next

आगरदांडा : मुरूड तालुक्यावर गेल्या दोन दिवसांपासून धुकेसदृश धुळीची चादर पसरलेली आहे. एकीकडे तापमान वाढत आहे, त्यात अचानक वातावरणात धुळीचे प्रमाण वाढल्याने मुरुड तालुक्यातील नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. तालुक्यातील जंजिरा किल्लाही धुळीमुळे दिसेनासा झाला आहे.
आखाती देशात काही दिवसांपूर्वी मोठ्या प्रमाणात वादळ उठले होते. त्याचाच परिणाम राज्यासह सर्वत्र जाणवत आहे. अचानक धुळीचे साम्राज्य वाढल्याने वाहनचालकांना अडचणी येत आहेत. तसेच समुद्रकिनाऱ्यांच्या परिसरातही धुळीचे लोण जाणवत आहे. मुरूड, आगरदांडा व राजपुरी बंदरातून दिघीसाठी होणाऱ्या प्रवासी वाहतुकीवरही याचा परिणाम जाणवत होता. (वार्ताहर)

Web Title: Janjira fort destroyed in dust; Lessons for tourists

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.