Join us

जंतर-मंतरवर लॉटरी विक्रेते धडकणार, २८ टक्के जीएसटी कमी करण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2017 6:09 AM

मुंबई : लॉटरी व्यवसायावर आकारण्यात आलेल्या २८ टक्के वस्तू व सेवा कराविरोधात लॉटरी रोजगार बचाव महाकृती समितीने आक्रमक पवित्रा घेतला आहे.

मुंबई : लॉटरी व्यवसायावर आकारण्यात आलेल्या २८ टक्के वस्तू व सेवा कराविरोधात लॉटरी रोजगार बचाव महाकृती समितीने आक्रमक पवित्रा घेतला आहे. केंद्र, राज्य शासनासह जीएसटी परिषदेसमोर विविध मार्गाने मागणी केल्यानंतरही समाधानकारक तोडगा निघालेला नाही. म्हणून लवकरच दिल्लीतील जंतर-मंतर मैदानावर धडक मोर्चा काढण्याचा इशारा महाकृती समितीच्या समन्वयक स्नेहल शहा यांनी दिला आहे.शहा यांनी सांगितले की, जीएसटी आकारताना लॉटरी विक्रेत्यांचा कोणताही विचार करण्यात आलेला नाही. म्हणूनच सुमारे ६० टक्के लॉटरी व्यवसाय ठप्प पडला आहे. २८ टक्के करामुळे व्यवसायाचे कंबरडे मोडले असून, लाखो लोकांचा हक्काचा रोजगार गेला आहे. त्यामुळे त्यांच्या कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ आली आहे. शासनालाही या निर्णयामुळे कोट्यवधी रुपयांच्या महसुलावर पाणी सोडावे लागले आहे. त्यामुळे सरकारने या गंभीर समस्येकडे दुर्लक्ष करू नये, असे आवाहनही शहा यांनी केले.विरोध नाही, टक्केवारी कमी करालॉटरी व्यवसाय बंद पडत असल्याने मटका व्यवसाय तेजीत सुरू झाल्याचा आरोपही समितीने केला आहे. त्यामुळे मटक्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी सरकारने जीएसटीचा पुनर्विचार करण्याचे आवाहन समितीने केले आहे. जीएसटीला विक्रेत्यांचा विरोध नसून त्याची टक्केवारी कमी करावी, अशी मागणी समितीने केली आहे. अन्यथा सरकारविरोधात उग्र आंदोलन व निदर्शने करण्याचा इशाराही समितीने दिला आहे.

टॅग्स :मुंबई