Join us  

'जरांगे मराठा समाजाचे प्रश्न मांडतायत, पण जातीय सलोखा टिकवणं गरजेचं'; ओमराजे निंबाळकरांनी स्पष्टच सांगितलं

By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2024 12:34 PM

Omraje Nimbalkar : गेल्या काही दिवसापासून मराठा आरक्षणाची मागणी सुरू आहे. मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलनही सुरू केले आहे.

Omraje Nimbalkar ( Marathi News ) : गेल्या काही महिन्यांपासून राज्यात मराठा आरक्षणाची मागणी सुरू आहे. मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आंदोलन सुरू केलं आहे. ओबीसी आरक्षण बचावासाठी लक्ष्मण हाके यांनीही आता आंदोलन सुरू केलं आहे. दरम्यान, खासदार ओमराजे निंबाळकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 

ओमराजे निंबाळकर म्हणाले, सुप्रीम कोर्टात मराठा आरक्षणाची याचिका आली होती. तेव्हा संसदेत मराठा आरक्षणाची बाजू घेणारा मी एकमेव खासदार होतो. संसदेत मी प्रामाणिकपणे मत मांडलं होतं. तामिळनाडू राज्यात अशीच परिस्थिती आली होती तेव्हा सरकारने जी पाऊले उचलली होती. तिच पाऊलं आता उचलावीत यासाठी मी हा मुद्दा मांडत आहे. समाजाला गरज का आहे हे पटवून दिलं आहे. मी पहिल्या दिवसापासून आरक्षणासाठी पाठपुरावा करत आहे, असंही ओमराजे निंबाळकर म्हणाले. 

मागे खंजीर कुणी खुपसले? पक्क माहीत; तुम्ही 'या' भूमिकेवर या, मराठा डोक्यावर घेऊन नाचेल! जरांगे यांचा सरकारला नवा सल्ला

सगळ्याच समाजात जातीय सलोखा असणे ही राज्याची गरज आहे. हे जबाबदारी सरकारची आहे. सरकारने जी आश्वासने दिली आहेत त्याची पुर्तता करण्याची गरज आहे. मराठा समाजाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील झटत आहेत. पण, सगळ्यांनीच जातीय सलोखा टिकवणं गरजेचा आहे, असंही खासदार ओमराजे निंबाळकर म्हणाले.   

जनतेने लोकसभेत दाखवून दिलं

"लोकसभाहीने तयार झालेले पक्ष, ज्यांनी पक्ष स्थापन केलं त्यांचाच पक्ष नाही असं सांगितलं. पक्षातून बेदखल केलं, चिन्ह काढून घेतलं. निवडणूक आयोगाला हाताशी धरुन हा प्रकार केला होता. जनतेला गृहीत धरुन हा प्रकार केला होता, जनतेने या लोकसभा निकालात याच उत्तर दिलं आहे. शरद पवार साहेब आणि उद्धव ठाकरे यांनी संघर्ष करण्याची तयारी दाखवली. आता हे सगळ्या महाविकास आघाडीच्या नेत्यांचे श्रेय आहे. आज मी साहेबांची भेट घेऊन आशीर्वाद घेतले, असंही खासदार ओमराजे निंबाळकर म्हणाले. 

जरांगे यांचा सरकारला नवा सल्ला

जरांगे म्हणाले, "मागचे पाढे गिरवत बसण्यापेक्षा, मागे खंजीर कुणी खुपसले आहेत? हे मराठ्यांना पक्क माहीत आहे. १६ टक्के आरक्षण देऊन मराठ्यांचे वाटोळे कुणी केले? हेही मराठ्यांना माहीत आहे. पण तुम्हीही त्याच पावलावर पाऊल ठेवून चाललात. नुसते देतात आणि ६ महिन्यांत उडाले. लोकांना छाती ठोकूण म्हणताच येईनना की, त्यांनी पाठीत खंजीर खुपसला आपलं आरक्षण दिलं, आपलं वाटोळं केलं. पण तुम्ही दिलं ते वर्षभर टिकले अथवा पिढ्यानंपार टिकले, असे मराठ्यांना छाती ठोकून सांगताच येईनना, त्यामुळे दोघेही सारखेच झालेना तुम्ही, एका पारड्यातले."

टॅग्स :ओमराजे निंबाळकरशिवसेनामनोज जरांगे-पाटीलमराठा आरक्षण