स्मार्ट मीटर देणार ग्राहकांना ‘झटका’; ४ खासगी कंपन्यांना कंत्राट

By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2023 08:12 AM2023-09-24T08:12:00+5:302023-09-24T08:12:21+5:30

महावितरणाचे ४ खासगी कंपन्यांना कंत्राट

'Jatka' to customers who will be given smart meters | स्मार्ट मीटर देणार ग्राहकांना ‘झटका’; ४ खासगी कंपन्यांना कंत्राट

स्मार्ट मीटर देणार ग्राहकांना ‘झटका’; ४ खासगी कंपन्यांना कंत्राट

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : राज्यात स्मार्ट मीटर बसविण्यासाठीचे कंत्राट महावितरणने चार खासगी कंपन्यांना दिले असून,  १२ हजार रुपये इतकी किंमत असणारा हा स्मार्ट मीटर  वीज ग्राहकांना कसा परवडणार, असा सवाल महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेने केला आहे. जर का वीज ग्राहकांचा मीटर नादुरुस्त झाला, जळाला तर काय होईल? आणि त्यांना कोणते मीटर देणार? म्हणजेच स्मार्ट मीटरचा भार सरतेशेवटी वीज ग्राहकांवरच पडणार असल्याने त्यांनाही स्मार्ट मीटरचा शॉक बसणार आहे.

महावितरणने राज्यात अदानी, एनसीसी, मॉण्टेकार्लो व जीनस यांना स्मार्ट मीटरचे कंत्राट दिले आहे. अदानीला यापूर्वीच बेस्टकडून स्मार्ट मीटर बसविण्याचे कंत्राट मिळाले आहे. यावर राजकीय क्षेत्रातून टीका होत असतानाच आता महावितरणच्या स्मार्ट मीटरचे कंत्राटही अदानीसह इतर ३ कंपन्यांना मिळाले आहे. अदानी समूहासह महावितरणकडे याबाबत विचारणा केली असता प्रतिक्रिया उपलब्ध होऊ शकली नाही.  

वीज तज्ज्ञ म्हणतात...
 प्रताप होगाडे यांच्या म्हणण्यानुसार,  एका मीटरची किंमत बारा हजार रुपये आहे. ग्रामीण भागातील ग्राहकांना विजेचे बिलही बारा हजार रुपये इतके असेल तर त्यासाठीही बराच काळ जावा लागतो, तसेच तितकी त्यांची कुवतही नसते. 
 म्हणजेच मीटरची किंमत त्यांच्या बिलापेक्षाही अव्वाच्या सव्वा ठरली आहे. सुमारे २७ हजार कोटी रुपयांचा प्रकल्प राबवण्याअगोदर त्याची सफल चाचणी कुठल्या क्षेत्रामध्ये घेतलेली आहे, याचादेखील अभ्यास नाही. 
 केंद्राचा यात ६० टक्के वाटा असला तरी ४० टक्के भार महावितरणला उचलायचा असून तो ग्राहकांकडूनच वसूल केला जाणार आहे. 

 

कुठे बसविणार कोण, किती स्मार्ट मीटर
कंपनी     झोन     मीटर     किंमत (कोटी)
अदानी     भांडुप, कल्याण, कोकण     ६३,४४,०६६     ७,५९४.४५
अदानी     बारामती, पुणे     ५२,४५,९१७     ६,२९४.२८
एनसीसी     नाशिक, जळगाव     २८,८६,६२२     ३,४६१.०६
एनसीसी     लातूर, नांदेड, छ. संभाजीनगर     २२,७७,७५९     ३,३३०.५३
मॉण्टेकार्लो     चंद्रपूर, गोंदिया, नागपूर     ३०,३०,३४६     ३,६३५.५३
जीनस     अकोला, अमरावती     २१,७६,६३६     २,६०७.६१
 

Web Title: 'Jatka' to customers who will be given smart meters

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.