जाऊ दे रे गाडी... ST महामंडळात 5 हजार कंत्राटी चालकांची लवकरच भरती

By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2022 12:51 PM2022-06-20T12:51:13+5:302022-06-20T12:52:16+5:30

यासंदर्भात पुढील 2-3 दिवसात जाहिरात निघणार आहे. या भरतीच्या माध्यमातून चालकांची संख्या वाढणार आहे. 

Jau de re gaadi ... ST Corporation recruits 5000 contract drivers soon | जाऊ दे रे गाडी... ST महामंडळात 5 हजार कंत्राटी चालकांची लवकरच भरती

जाऊ दे रे गाडी... ST महामंडळात 5 हजार कंत्राटी चालकांची लवकरच भरती

Next

मुंबई - राज्यात ऐन दिवाळीत बेमुदत संप पुकारलेल्या एसटी कामगारांच्या संपामुळे सर्वसामन्य जनतेला नाहक त्रास सहन करावा लागला. तर, एसटी महामंडळाचेही कोट्यवधी रुपयांची नुकसान झाले. अखेर 5 महिन्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाने हा संप मिटला. कामगारांच्या या संपातून बोध घेत एसटी महामंडळाने सुमारे 5 हजार कंत्राटी चालकांची भरती करण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भात पुढील 2-3 दिवसात जाहिरात निघणार आहे. या भरतीच्या माध्यमातून चालकांची संख्या वाढणार आहे. 

महामंडळाने एसटी कामगारांच्या बेमुदत संपानंतर कंत्राटी चालकांची भरती केली होती. मात्र, संप मिटताच या कंत्राटी चालकांना कामावरुन कमी करण्यात आलं होतं. तर, काहींना मुतदवाढही देण्यात आली होती. त्यामध्ये, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पालघर, लातूर, बीड, जालना, उस्मानाबाद या विभागांतील कंत्राटी चालकांचा समावेश आहे. त्यामुळे, आता, पाच हजार कंत्राटी चालकांची खासगी कंपनीमार्फत भरती करण्यात येईल़ ही भरती टप्प्याटप्प्याने होईल, याबाबतची जाहिरात दोन-तीन दिवसांत काढण्यात येईल, असे महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांनी म्हटले आहे.

राज्यातील कोकण, पुणे विभागासह अन्य काही विभागांत एसटीच्या चालकांची कमतरता भासत आहे. त्यातूनच, अनेकदा बसगाड्या स्थानकातच पडून राहतात. त्यामुळे, महामंडळाकडून नव्याने 5 हजार कंत्राटी चालकांची भरती करण्यात येणार आहे. सध्या परीक्षा देऊन ''प्रतीक्षा यादीवर असलेले कर्मचारी हे कायमस्वरूपी कर्मचारी म्हणून एसटीत येऊ शकतात. एसटीतील निवृत्त कर्मचाऱ्यांची संख्या वाढल्यास, लवकरच प्रतिक्षा यादीतील उमेदवारांना संधी मिळेल, याबाबतच निर्णय लवकरच होईल, असे महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांनी म्हटले आहे.
 

Web Title: Jau de re gaadi ... ST Corporation recruits 5000 contract drivers soon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.