मुंबई : गेल्या काही दिवसांपासून शहर व उपनगरात विनयभंगाच्या घटनांची मालिका सुरूच आहे. जुहूत शनिवारी एका विकृताने महिलेसमोर अश्लील वर्तन करीत पलायन केले. त्याच्या या कृत्याबाबत जुहू पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र या परिसरात सातत्याने हा प्रकार होत असूनही पोलिसांना त्याला पकडण्यात अद्याप यश न आल्याने महिला व तरुणींच्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.शनिवारी सकाळी जुहू सर्कलजवळ २६ वर्षांच्या एका तरुणाने बाजूला जात असलेल्या एका महिलेला ‘ओ मॅडम जरा यहा आना,’ असे म्हणत बोलाविले. ती त्याच्याजवळ गेली असता तरुणाने आपली पॅण्ट खाली करीत अश्लील चाळे केले.या प्रकाराने घाबरलेली महिला ओरडली असता त्याने पलायन केले. त्यानंतर तिने जुहू पोलीस ठाण्यात तक्रार दिली. गेल्या काही दिवसांपासून या परिसरात अशा घटना घडत असून, दोन महिलांनी याविरोधात तक्रार दाखल केली आहे. पोलीस घटनास्थळीच्या सीसीटीव्ही फूटेजची तपासणी करीत आहेत.
जुहूमध्ये महिलांना पाहून अश्लील चाळे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2017 2:52 AM