जावेद अख्तर मानहानी दावा प्रकरण; न्यायालयाने मागितले न्यायालयाकडूनच उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: October 2, 2021 06:13 AM2021-10-02T06:13:24+5:302021-10-02T06:13:49+5:30

कंगना रनौत हिने या दाव्यावरील सुनावणी अन्य न्यायालयांत वर्ग करण्याचा अर्ज मुख्य न्यायदंडाधिकारी यांच्याकडे केला.

Javed Akhtar defamation suit The court sought an answer from the court itself pdc | जावेद अख्तर मानहानी दावा प्रकरण; न्यायालयाने मागितले न्यायालयाकडूनच उत्तर

जावेद अख्तर मानहानी दावा प्रकरण; न्यायालयाने मागितले न्यायालयाकडूनच उत्तर

Next
ठळक मुद्दे कंगना रनौत हिने या दाव्यावरील सुनावणी अन्य न्यायालयांत वर्ग करण्याचा अर्ज मुख्य न्यायदंडाधिकारी यांच्याकडे केला.

मुंबई : प्रसिद्ध गीतकार जावेद अख्तर यांनी केलेल्या मानहानी दाव्यावर सुनावणी घेणाऱ्या न्यायालयावर आपला विश्वास नाही, असे म्हणत अभिनेत्री कंगना रनौत हिने या दाव्यावरील सुनावणी अन्य न्यायालयांत वर्ग करण्याचा अर्ज मुख्य न्यायदंडाधिकारी यांच्याकडे केला. शुक्रवारी या अर्जावरील सुनावणीत मुख्य दंडाधिकाऱ्यांनी हा दावा वर्ग करण्याबाबत अंधेरी न्यायदंडाधिकाऱ्यांकडून उत्तर मागितले आहे.

प्रभारी मुख्य न्यायदंडाधिकारी एस.टी. दांडे यांनी म्हटले की, अर्जदाराने (कंगना) केलेल्या तक्रारींवर आपल्याला दंडाधिकारी आर.आर. खान यांचे म्हणणे ऐकायचे आहे. कंगना हिने दंडाधिकारी आर.आर. खान यांच्यावर पक्षपतीपणा करत असल्याचा आरोप केला आहे. 

मुख्य दंडाधिकारी दांडे यांनी अख्तर यांनी कंगनाच्या अर्जावर दिलेले उत्तरही रेकॉर्डवर घेतले. असे अर्ज दाखल करून कंगना केवळ वेळकाढूपणा करत आहे, असे अख्तर यांचे म्हणणे आहे. कंगनाच्या अर्जावर १८ ऑक्टोबर रोजी सुनावणी ठेवण्यात आली आहे.

Web Title: Javed Akhtar defamation suit The court sought an answer from the court itself pdc

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.