जव्हार : जव्हार-सिल्व्हासा हा एकेरी रस्ता खड्डे आणि उंच सखल साईडपट्या यामुळे धोकादायक ठरला असून त्याचे रुंदीकरण करण्यात यावे अशी मागणी ग्रामस्थांची आहे. या मार्गवार गुजरात- दादरा नगर हवेली कडून नाशिकला जाण्यासाठी अवजड वाहनांची मोठ्याप्रमाणात वर्दळ असते, त्यात जांभूळविहिर परिसरांत मोठ्या प्रमाणात लोकवस्ती वाढली. तेथून पादचाऱ्यांच्या - मोटारसायकल व अन्य वाहनांची, वर्दळ असते, त्यामुळे या सिंगल रोडवर अनेकदा अपघाताच्या घटना घडल्या आहेत. तरीही आजपर्यंत एकदाही साईडपट्टीचे काम व्यवस्थित केलेले नाही. पावसाळ्यापूर्वी खडी आणायची, ती टाकून थातूर मातूर काम करून टाकायचे, असाच प्रकार घडताना दिसतो. मग काही दिवसातच परिस्थिती जैसे थे होऊन जाते. मात्र, हा प्रकार यामुळे नागरिकांना अपघाताच्या धोक्याचा सामना करावा लागतो.शहरापासून अवघ्या १ कि.मी. अंतरावरील जांभूळ विहिर येथे खराब आणि अरूंद रस्ता तसेच वरखाली झालेली साईडपट्टी अशा कारणांमुळे बहुतांश रस्त्यांवर अपघात होतात. मात्र प्रशासनाने अजूनही रस्ता व साईडपट्टी दुरूस्ती केलेली नाही. या जांभूळ विहिरीसमोरील मार्गवर मोठ्या प्रमाणात वसाहत झाली आहे. त्यामुळे, येथे वर्दळ वाढली आहे. तसेच खेडोपाड्यातून कंपनीच्या मालवाहू गाड्यांची ये-जा सुरू असते. तरीही प्रशासनाला जाग येत नसल्याने जांभूळविहिरकर आणि वाहन चालकांनी रस्ता रूंदीकरण करावे अशी मागणी केली आहे. (वार्ताहर)
जव्हार - सिल्व्हासा रस्ता रूंदीकरणाची मागणी
By admin | Published: February 01, 2015 11:43 PM