जव्हार एसटी डेपोत सुविधा वाऱ्यावर
By Admin | Published: June 16, 2014 02:33 AM2014-06-16T02:33:41+5:302014-06-16T02:33:41+5:30
नुकताच येथील कामगार प्रताप मते यांचा झालेला मृत्यूही या गैरसोयीतूनच झाल्याची तक्रार होत असताना या सुविधांकडे मात्र महामंडळ डोळेझाक करीत असल्याचेच समोर आले आहे.
जव्हार : येथील एसटी आगारातील चालक धर्मराज माधवराव साळुंखे (५२) यांना आज रविवारी सेवेत असताना आगार व्यवस्थापकांच्या केबिनमध्ये घुसून जव्हार अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचारी गणेश पांडुरंग मोकाशी (४८) व विजय दिनका शार्दूल (३८) यांनी जबर मारहाण केली. यात साळुंखे यांना गंभीर दुखापत झाल्याने जव्हार ग्रामीण रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
साळुंखे यांनी जव्हार पोलीस ठाण्यामध्ये तक्रार केली असता दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला. आपल्या फिर्यादीत साळुंखे यांनी १२ रोजी रात्री ९.१५ वा. अकोला-जव्हार ही बस चालविताना मोखाडा तालुक्यातील वॉलब्रिज येथे साईट देण्यावरून शार्दूल व मोकाशी यांनी साळुंखे यांच्याशी हुज्जत घालत शिवीगाळ केली. त्यानंतर प्रशांत सटाणेकर यांच्या केबिनमध्ये येवून सेलवास-सिन्नर बस घेवून जाणाऱ्या चालक साळुंखे यांना आगारात बोलाविण्याचा आग्रह धरल्याने सटाणेकर यांनी त्यांना सेवेवर असताना बोलावून घेतले. साळुंखे यांनी केबिनमध्ये प्रवेश करताच आगार व्यवस्थापक सटाणेकर यांच्या समक्ष साळुंखे यांना लाथाबुक्क्यांनी जबर मारहाण करून तेथून तात्काळ पळ काढला.
या मारहाणीत त्यांच्या पोटाला व पाठीला जबर मार लागून ते जमिनीवर कोसळले. कामगारांनी त्यांना तात्काळ ग्रामीण रुग्णालयात हलविले. तेथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. रात्री उशिरा आरोपी स्वत:हून पोलीस ठाण्यामध्ये हजर झाले. त्यांना अटक करून गुन्ह्याची नोंद करण्यात आली. दुसऱ्या दिवशी त्यांना न्यायालयात हजर केले असता त्यांनी जामिनावर सुटका करण्यात आली. पुढील तपास जव्हार पोलीस निरीक्षक केशवराव नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक के. जे. महाले हे करीत आहेत. (वार्ताहर)