भरतीत स्थानिकांना प्राधान्य मिळावे यासाठी जव्हारला मोर्चा

By Admin | Published: April 7, 2015 10:51 PM2015-04-07T22:51:38+5:302015-04-07T22:51:38+5:30

महाराष्ट्र शासनाने पालघर जिल्हा हा आदिवासींसाठी आरक्षित जिल्हा म्हणून घोषित केला आहे. त्यामुळे या जिल्ह्यातील शासकीय पट्ट्याची

Jawharlal Front to get priority in the recruitment of local residents | भरतीत स्थानिकांना प्राधान्य मिळावे यासाठी जव्हारला मोर्चा

भरतीत स्थानिकांना प्राधान्य मिळावे यासाठी जव्हारला मोर्चा

googlenewsNext

जव्हार ग्रामीण : महाराष्ट्र शासनाने पालघर जिल्हा हा आदिवासींसाठी आरक्षित जिल्हा म्हणून घोषित केला आहे. त्यामुळे या जिल्ह्यातील शासकीय पट्ट्याची कोणतीही नोकरी भरती असो या नोकर भरतीत जिल्ह्यातील स्थानिकांना प्राधान्य द्यावे या मागणीसाठी आदिवासी अनुसूचित जमातीतील सुशिक्षित बेरोजगार युवातरूणांनी जव्हारच्या एकात्मिक आदिवासी विकास विभागावर मोर्चा काढला. हा मोर्चा जुना राजवाडा ते आदिवासी विकास कार्यालयापर्यंत होता.
आदिवासी सुशिक्षित बेरोजगार मोर्चात जव्हार, मोखाडा, विक्रमगड, वाडा अशा पालघर जिल्ह्यातील आदिवासी विकास प्रकल्पाअंतर्गत मोडणाऱ्या जिल्ह्यातील शेकडो सुशिक्षित बेरोजगार सहभागी झाले होते. तर आदिवासी सुशिक्षित बेरोजगारांचा मोठा सहभाग होता. जव्हार प्रकल्पातील कुठल्याही नोकर भरतीत स्थानिक व आदिवासींना स्थान द्यावे तसेच स्थानकाच्या विविध योजना प्रथम आदिवासींना द्यावे अशा मागण्या या मोर्चा दरम्यान करण्यात आल्या आहेत. आदिवासी सुशिक्षित बेरोजगार तरूणांना सर्व होणाऱ्या भरती, शासनाच्या विविध योजना प्रथम देऊ असे लेखी आश्वासन अधिकाऱ्यांनी दिले. त्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. (वार्ताहर)

Web Title: Jawharlal Front to get priority in the recruitment of local residents

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.