भिवंडीतील शिवमंदिरात जय भोलेचा जयघोष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2020 12:39 AM2020-02-22T00:39:25+5:302020-02-22T00:39:40+5:30

अकलोलीमध्ये पालखी सोहळा

Jay Bhole's announcement at Shiv Temple in Bhiwandi | भिवंडीतील शिवमंदिरात जय भोलेचा जयघोष

भिवंडीतील शिवमंदिरात जय भोलेचा जयघोष

googlenewsNext

भिवंडी : भिवंडी शहर व ग्रामीण परिसरात महाशिवरात्र उत्साहात साजरी झाली. भक्तांनी मंदिरात दर्शनासाठी गर्दी केली होती. रामेश्वर मंदिरात विविध कार्यक्र म झाले. मंदिराला विद्युत रोषणाई व फुलांची आरास केली होती. कल्याण तसेच ठाणे मार्गावर नगर प्रदक्षणा पालखी काढण्यात आली. तसेच प्रजापिता ब्रह्मकुमारी विश्वशांती विद्यालयाच्या वतीने राजयोग शिबिर घेतले.

शहरातील पुरातन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्री.रामेश्वर मंदिरात अखंड हरिनाम सप्ताह झाला. शहरातील नीळकंठ मंदिर, मार्केंड मंदिर, खडबडेश्वर मंदिर, काशीविश्वनाथ मंदिर तसेच ग्रामीण भागातील वडघर , वडूनवघर , कारीवली , खारबाव , बंगलापाडा येथेही कार्यक्रम झाले.

अकलोलीमध्ये पालखी सोहळा

वज्रेश्वरी : वज्रेश्वरी, गणेशपुरी आणि अकलोली कुंड येथे महाशिवरात्री उत्साहात साजरी झाली. वज्रेश्वरीदेवी मंदिरातील शंकर मंदिर, बुद्धबाबा येथील नर्मदेश्वर महादेव मंदिर, गणेशपुरी येथील प्राचीन भीमेश्वर मंदिर आणि अकलोली येथील प्राचीन रामेश्वर मंदिर या ठिकाणी धार्मिक कार्यक्रम झाले. पालखी सोहळ्यासाठी भाविक आणि ग्रामस्थांनी दर्शनासाठी गर्दी केली होती.

महाशिवरात्रीनिमित्त भाविकांची रीघ
शहापूर : शहापूरमधील शिवकालीन गंगा देवस्थानावर महाशिवरात्रीनिमित्त दर्शनासाठी भाविकांची गर्दी उसळली होती.
शहापूरपासून जवळच असलेल्या वाफे गावाच्या हद्दीत गंगा देवस्थान व महादेवाची दोन मंदिरे आहेत. श्री क्षेत्र गंगादेवस्थान न्यासाचे अध्यक्ष राधेश्याम अग्रवाल यांच्या हस्ते शुक्रवारी मध्यरात्री १२ च्या सुमारास गंगापूजन व अभिषेक झाला. त्यानंतर भाविकांनी महादेवाचे दर्शन घेण्यास सुरुवात केली.
महाशिवरात्रीनिमित्त शहापूर ते गंगा देवस्थान या रस्त्यावर जत्रा भरवण्यात आली होती. येथे विविध प्रकारचे स्टॉल लावण्यात आले होते. शहापूरसह मुरबाड, भिवंडी, कसारा, खर्डी, किन्हवली, माहुली, सावरोली, डोळखांब येथील भाविक आले होते. गंगा देवस्थानचे सुभाष गुजरे, संदीप देशमुख, बी.व्ही. चंदा, डॉ. प्रशांत पाटील व मुकुंद जोशी, विलास जोशी, कमलेश कुंदर आदींनी भाविकांच्या दर्शनासाठी उत्तम व्यवस्था केली होती.
 

Web Title: Jay Bhole's announcement at Shiv Temple in Bhiwandi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.