मुंबई - महाराष्ट्रात सरकार स्थापनेचा दावा करू इच्छिणाऱ्या पक्षांना पाठिंबा दिल्याचे प्रत्येक आमदाराचे त्याच्या स्वाक्षरीचे पत्र सादर करावे, अशी अट राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी घातली असल्याच्या ‘लोकमत'च्या वृत्ताला शिवसेना नेते खा संजय राऊत यांनी सोमवारी दुजोरा दिला. ते म्हणाले की, 288 पैकी 170 आमदारांची पाठिंब्याची पत्रे लवकरच राज्यपालांना सादर करू. मात्र, शरद पवारांनी सोनिया गांधींच्या भेटीनंतर शिवसेनेसोबत कसलिही चर्चा सुरू नसल्याचं म्हटलंय. त्यामुळे महाशिवआघाडीचा सस्पेन्स आणखी वाढलाय.
शिवसेना प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांनी आज पुन्हा एकदा ट्विट केले आहे. मात्र, आजच्या ट्विटमध्ये त्यांनी जय महाराष्ट्र असे लिहलंय. त्यामुळे हे ट्विट नेमकं कोणासाठी आहे, याचा अनेक प्रकार कयास लावता येईल. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी सोमवारी काँग्रेसच्या कार्यकारी अध्यक्षा सोनिया गांधींची भेट घेतली. त्यानंतर, पत्रकारांशी बोलताना, सोनिया आणि माझ्यात महाशिवआघाडीसंदर्भात कुठलिही चर्चा झाली नसल्याचं म्हटलंय. तसेच, मिनिमम कॉमन प्रोग्रामचंही काहीच ठरलं नसल्याच पवारांनी म्हटलंय. त्यामुळे महाशिवआघाडीच्या सरकार स्थापनेबाबतचा गोंधळ आणखी वाढला आहे. त्यामुळेच नेहमीच भाजपा नेत्यांवर टीका करणाऱ्या संजय राऊतांचे आजचे ट्विट नेमकं कोणाला उद्देशून आहे, याची चर्चा रंगणार हे नक्की.
अगर जिंदगी मे कुछ पाना हैतो तरीके बदलो, इरादे नहीजय महाराष्ट्र....
असे ट्विट राऊत यांनी केले आहे. त्यामुळे आता महाशिवआघाडीचा सस्पेन्स आणखी वाढला आहे. संजय राऊत यांनी नेमकं कोणाला जय महाराष्ट्र केलाय, हे सध्यातरी अनुत्तरीतच आहे. मात्र, काही दिवसांपासून शिवसेनेनं भाजपाला जय महाराष्ट्र केल्याचं दिसून आलंय.