जयंत पाटील, आव्हाडही भाजपसोबत जाणार होते; प्रफुल्ल पटेल यांचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 6, 2023 08:18 AM2023-10-06T08:18:39+5:302023-10-06T08:19:14+5:30

जयंत पाटील हे त्याचवेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना भेटायला जाणार होते, असंही पटेल म्हणाले.

Jayant Patil, Awhad was also going with BJP; Claimed by Praful Patel | जयंत पाटील, आव्हाडही भाजपसोबत जाणार होते; प्रफुल्ल पटेल यांचा दावा

जयंत पाटील, आव्हाडही भाजपसोबत जाणार होते; प्रफुल्ल पटेल यांचा दावा

googlenewsNext

मुंबई :जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड यांच्यासह राष्ट्रवादीच्या तत्कालीन सर्व मंत्र्यांसह सर्व आमदार हे जून २०२२ मध्येच भाजपसोबत जायला तयार होते; त्यांनी तसे शरद पवार यांना लेखी दिलेले होते, असा दावा राष्ट्रवादीचे (अजित पवार गट) राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार प्रफुल्ल पटेल यांनी गुरुवारी एका वृत्त वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत केला.

जून २०२२ मध्ये काय होणार होते?

 पटेल म्हणाले की, एकनाथ शिंदे हे शिवसेनेतून बंड करून सुरत आणि नंतर गुवाहाटीला गेले तेव्हाचीच ही घटना आहे. राष्ट्रवादीच्या सर्व ५१ आमदारांनी (अनिल देशमुख, नवाब मलिक सोडून; कारण ते तेव्हा तुरुंगात होते) शरद पवार यांना लेखी दिले होते की ते भाजपसोबत सरकार स्थापन करायला तयार आहेत.

 जयंत पाटील हे त्याचवेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना भेटायला जाणार होते. त्यांनी तसा कॉल शरद पवार यांना केला तेव्हा पवार यांनी त्यांना दोन-तीन दिवस थांबायला सांगितले. माध्यमांमध्ये फार चर्चा होईल, असे ते म्हणाले. त्यातच दोन-तीन दिवस निघून गेले आणि एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले.

 शिंदे यांचे मुख्यमंत्री होणे हे आमच्यासाठी आश्चर्यकारक होते; कारण देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री होतील, असे आम्हाला वाटले होते. पक्षातील सहा-सात नेत्यांना चौकशी एजन्सींचा त्रास होता म्हणून ते भाजपसोबत जाण्यास सांगत होते, या शरद पवार यांच्या विधानात तथ्य नाही.

Web Title: Jayant Patil, Awhad was also going with BJP; Claimed by Praful Patel

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.