ज्येष्ट संगीतकार आणि व्हायोलिन वादक नंदू होनप यांचे निधन
By admin | Published: September 18, 2016 10:28 AM2016-09-18T10:28:37+5:302016-09-18T10:28:37+5:30
भक्तिसंगीताच्या माध्यामातून घराघरात पोहचलेले ज्येष्ट संगीतकार आणि व्हायोलिन वादक नंदू होनप यांच काल रात्री झाले. ते ८२ वर्षाचे होते.
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. १८ : भक्तिसंगीताच्या माध्यामातून घराघरात पोहचलेले ज्येष्ट संगीतकार आणि व्हायोलिन वादक नंदू होनप यांच काल रात्री उशीरा ह्रद्यविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. वयाच्या ८२ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. निघालो घेऊन दत्ताची पालखी...स्वामी समर्था माझी आई..अशा अनेक भक्तीगीतांचे संगीतकार होते.
भक्तीसंगीतात माहीर असलेले प्रसिद्ध संगीतकार होनप यांनी कॅसेटच्या काळात संगीताने सर्वांनाच वेड लावलं होतं. त्यांनी ५६ चित्रपटांना संगीत दिले असून दूरदर्शन, नाट्य याही क्षेत्रात स्वामींच्या आशीर्वादाने रसिकांची संगीतसेवा केली आहे. अजित कडकडे, सुरेश वाडकर, अनुराधा पौडवाल, सोनू निगम या गायक कलाकारांसोबत त्यांनी काम केलं आहे. स्वामी समर्थांचे निःसिम भक्त असलेल्या या प्रतिभावान संगीतकाराला भावपूर्ण श्रद्धांजली