लंडनच्या रस्त्यावर "भारत माता की जय" चा जयघोष करणाऱ्या देशभक्त जयेश शहा यांचा गौरव
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2020 20:20 IST2020-02-28T20:19:14+5:302020-02-28T20:20:43+5:30
मुंबई भाजपाचे सरचिटणीस अमरजित मिश्रा यांनी लंडनमधील जयेश शहा यांचे राष्ट्रभक्ती विषयी ओळख करून दिली.

लंडनच्या रस्त्यावर "भारत माता की जय" चा जयघोष करणाऱ्या देशभक्त जयेश शहा यांचा गौरव
- मनोहर कुंभेजकर
मुंबई: लंडनच्या रस्त्यावर "भारत माता की जय" चा जयघोष करणाऱ्या देशभक्त जयेश शहा यांचा नुकताच मुंबईत गौरव करण्यात आला. माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि प्रदेश भाजपा अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शाह यांचा देशभक्तीसाठी खास गौरव केला .विधानसभेत भाजपा पक्ष कार्यालयात एका छोटेखानी कार्यक्रमात त्यांचा गौरव करण्यात आला.
मुंबई भाजपाचे सरचिटणीस अमरजित मिश्रा यांनी लंडनमधील जयेश शहा यांचे राष्ट्रभक्ती विषयी ओळख करून दिली. उल्लेखनीय बाब म्हणजे आज जेव्हा भारतीय लोकांना यूके सरकारमध्ये चांगले प्रतिनिधित्व मिळत आहे. लंडनच्या रस्त्यावर "भारत माता की जय" म्हणण्याची कोणतीही संधी ते गमावत नाही अशी माहिती अमरजित मिश्रा यांनी लोकमतला दिली.
गुजरातमधील मूळचे जयेश शाह यांचा जन्म केनियात झाला आहे. नंतर ते युकेत स्थाईक झाले.त्यांना "भारत माता की जय" आणि "वंदे मातरम" म्हणण्याची आवड असून सध्या ते भारत दौर्यावर आले आहेत. त्यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची भेट घेतली.