सेलिब्रिटींसह सामान्यांचा जाधवांना पाठिंबा

By admin | Published: April 14, 2017 03:51 AM2017-04-14T03:51:37+5:302017-04-14T03:51:37+5:30

माजी नौदल अधिकारी कुलभूषण जाधव यांना पाकिस्तानने सुनाविलेल्या फाशीच्या शिक्षेविरोधात देशभरातून संताप व्यक्त करण्यात येत आहे. सेलिब्रिटींसह सामान्य

Jeddah with celebrities and supporters | सेलिब्रिटींसह सामान्यांचा जाधवांना पाठिंबा

सेलिब्रिटींसह सामान्यांचा जाधवांना पाठिंबा

Next

मुंबई : माजी नौदल अधिकारी कुलभूषण जाधव यांना पाकिस्तानने सुनाविलेल्या फाशीच्या शिक्षेविरोधात देशभरातून संताप व्यक्त करण्यात येत आहे. सेलिब्रिटींसह सामान्य नागरिक त्याचा विविध माध्यमातून निषेध व्यक्त करत आहेत. गुरुवारी जाधव यांच्या पवईच्या राहत्या घराबाहेर रहिवाशांनी मानवी साखळी करुन शासनाकडे जाधवांना परत आणण्याची मागणी केली.
कुलभूषण जाधव यांना दिवसेंदिवस सर्व स्तरांतून पाठिंबा वाढत असल्याचे चित्र दिसून येत आहे. गुरुवारी जाधव यांच्या सुटकेसाठी पवई हिरानंदानी येथील सिल्वर ओक इमारतीच्या समोर १०० हून अधिक जणांनी मानवी साखळी तयार केली. यामध्ये त्यांचा लॉंड्री बॉय असलेल्या २६ वर्षीय विजय कनोजियाचाही होता. त्याने लोकमतला दिलेल्या माहितीनुसार, वयाच्या १५ व्या वर्षांपासून तो जाधव यांना ओळखतो. तो लॉड्री बॉय म्हणून काम करायचा. त्यावेळी जाधव यांनी त्याला मुलाप्रमाणे प्रेम दिले. शिक्षणासाठीही मदत केली. त्यामुळे आमच्या सारख्या तरुणांना पुढे जाता यावे यासाठी त्यांचा नेहमीच प्रयत्न असे.
तर दुसरीकडे सिनेक्षेत्रातून पाक निर्णयाचा निषेध व्यक्त करण्यात येत आहे. अभिनेता ऋषी कपूर, गायक अभिजीत भट्टाचार्य, गायक अदनान सामी, अभिनेता रणदीप हुड्डानंतर आता बॉलिवूड अभिनेत्री रविना टंडननेही पाकिस्तानच्या निर्णयावर आपला राग व्यक्त केला आहे. तर सलमान खानचे वडील आणि लेखक सलीम खान यांनीदेखील कुलभूषण जाधव प्रकरणी ट्वीट करत म्हटलं आहे की, ‘एका निष्पाप माणसाला मारणे म्हणजे माणुसकीलाच मारण्यासारखे आहे.’ (प्रतिनिधी)

व्हॉट्स डीपीत जाधव...
’कुलभूषण जाधव यांना परत आणा’ असा एकच सूर सध्या ऐकू येत आहे. त्यात शाळा, महाविद्यालयीन काही विद्यार्थ्यांच्या व्हॉट्स डीपींवरही कुलभूषण जाधवांचा फोटो ठेवून कुलभूषण जाधव यांना परत आणा’असा स्टेट्स ठेवण्यात येत आहे. प्रत्येक घराघरातून त्यांच्यासाठी पाठींबा मिळत आहे.

Web Title: Jeddah with celebrities and supporters

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.