जेईई अॅडव्हान्स सुरळीत!
By admin | Published: May 22, 2017 04:01 AM2017-05-22T04:01:30+5:302017-05-22T04:01:30+5:30
परीक्षा हॉलमध्ये ड्रेसकोड ठेवल्यामुळे गोंधळ उडण्याची भीती अनाठायी ठरवित जेईई अॅडव्हान्स रविवारी सुरळीत पार पडली.
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : परीक्षा हॉलमध्ये ड्रेसकोड ठेवल्यामुळे गोंधळ उडण्याची भीती अनाठायी ठरवित जेईई अॅडव्हान्स रविवारी सुरळीत पार पडली. परीक्षेची काठिण्य पातळी सामान्य असल्याचे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे.
६० टक्के प्रश्न १२वीच्या अभ्यासक्रमावर आधारित, तर ११वीच्या अभ्यासक्रमावर ४० टक्के प्रश्न विचारत गेल्या वर्षी या परीक्षेत १२वीच्या अभ्यासक्रमाला अधिक महत्त्व देण्यात आले होते. यंदा दोन्ही वर्षांच्या अभ्यासक्रमांना समसमान महत्त्व देण्यात आले होते.
१ लाख ७ हजार विद्यार्थी जेईई अॅडव्हान्ससाठी बसले होते. त्यात खुल्या वर्गातील आणि इतर मागासवर्गीय वर्गातील विद्यार्थ्यांची संख्या जवळपास समान आहे. महाराष्ट्र राज्य बोर्डाचे खुल्या वर्गातील ४ हजार ३९४ विद्यार्थी, तर इतर मागासवर्गीय वर्गातील ७ हजार ४६० विद्यार्थी आणि अनुसूचित जातीचे ४ हजार ६१९ विद्यार्थी या परीक्षेला बसले होते.