माझ्या दोन प्रश्नांची उत्तरे चुकीची कशी? वेद लाहोटीची आयआयटीकडे विचारणा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2024 08:23 AM2024-06-10T08:23:02+5:302024-06-10T08:23:25+5:30

JEE Advanced Exam: जेईई-ॲडव्हान्समधील आतापर्यंतच्या सर्व टॉपर्सच्या गुणांचे रेकॉर्ड तोडत ३५५ इतक्या भरघोस गुणांची कमाई करणाऱ्या वेद लाहोटी याला सध्या एक, नव्हे दोन प्रश्न भेडसावत आहेत. ते म्हणजे ३६० गुणांच्या परीक्षेतील आपल्या दोन प्रश्नांचे उत्तर चुकीचे कसे?

JEE Advanced Exam: How are the answers to my two questions wrong? Ved Lahoti's question to IIT | माझ्या दोन प्रश्नांची उत्तरे चुकीची कशी? वेद लाहोटीची आयआयटीकडे विचारणा

माझ्या दोन प्रश्नांची उत्तरे चुकीची कशी? वेद लाहोटीची आयआयटीकडे विचारणा

मुंबई- जेईई-ॲडव्हान्समधील आतापर्यंतच्या सर्व टॉपर्सच्या गुणांचे रेकॉर्ड तोडत ३५५ इतक्या भरघोस गुणांची कमाई करणाऱ्या वेद लाहोटी याला सध्या एक, नव्हे दोन प्रश्न भेडसावत आहेत. ते म्हणजे ३६० गुणांच्या परीक्षेतील आपल्या दोन प्रश्नांचे उत्तर चुकीचे कसे?

लहानपणापासून कुठल्याही गोष्टीवर लॉजिकल उत्तर शोधण्याची सवय असलेला वेद परीक्षेत लिहिलेल्या प्रत्येक प्रश्नाच्या उत्तराबाबतही काटेकोर असे. म्हणून शिक्षकांनी एखादा जरी गुण कापला, तर तो का कापला म्हणून आजोबांचे डोके खात असे. आत्ताही त्याच्या दोन प्रश्नांची उत्तरे चुकीची का ठरवली, अशी विचारणा त्याने आयआयटीकडे केली आहे.

वेदला मिळालेले ३६० पैकी ३५५ हे आत्तापर्यंतचे सर्वाधिक गुण आहेत. त्याने जेईई-मेनमध्येही ३०० पैकी २९५ गुणांची कमाई केली होती. त्याने अजूनतरी इंजिनिअरिंगच्या कुठल्या शाखेला किंवा कुठल्या संस्थेत प्रवेश घ्यायचा हे निश्चित केलेले नाही.

मूळचा इंदूरचा असलेल्या  वेदची आई जया गृहिणी आहेत, तर वडील योगेश बांधकाम व्यवस्थापक म्हणून कार्यरत आहेत. दहावीला ९८.६० टक्के, तर बारावीला ९७.६० टक्के गुणांची कमाई केलेला वेद गेली सात वर्षे जेईईची तयारी करत होता. ऑलिंपियाड स्पर्धेतही त्याने अव्वल कामगिरी केली आहे. नवनवीन विषयांवर वाचायला त्याला आवडते.

मुलींची संख्या वाढली
गेल्या वर्षीच्या तुलनेत आयआयटी प्रवेशाकरिता पात्र ठरलेल्या मुलींची संख्या वाढली आहे. गेल्या वर्षी ७,५०९ मुली प्रवेशपात्र ठरल्या होत्या. यंदा हा आकडा ७,९६४ इतका आहे. त्या आधीच्या वर्षी ६,५१६ मुली प्रवेशपात्र ठरल्या होत्या.

जेईई-ॲडव्हान्सचा कटऑफ वाढला
जेईई-ॲडव्हान्सचा कटऑफ यंदा चांगलाच वाढला आहे. गेल्या वर्षी खुल्या गटाचा कटऑफ २३.८९ टक्के इतका होता. यंदा तो ३०.३४ टक्के इतका झाला आहे. त्यामुळे प्रवेशासाठी चांगलीच चढाओढ असेल. 

 स्मार्टवर्कवर वेदचा भर राहिला आहे. अभ्यासाचे योग्य नियोजन करत असल्याने आठ तासांच्या झोपेशी तडजोड करणे त्याला मान्य नाही. गणित आणि भौतिकशास्त्र हे त्याचे आवडते विषय, तर चेस आणि क्रिकेट हे त्याचे आवडते खेळ आहेत. त्याला वाचन आवडते. त्याला टीव्ही, चित्रपट पाहायला आवडत नाही. दहावीनंतर जेईईच्या तयारीसाठी त्याने कोटाची निवड केली. 

Web Title: JEE Advanced Exam: How are the answers to my two questions wrong? Ved Lahoti's question to IIT

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.