मोठी बातमी! JEE Advanced परीक्षेचा निकाल जाहीर; आयआयटी मुंबई झोनचा चिराग अव्वल

By ऑनलाइन लोकमत | Published: October 5, 2020 12:13 PM2020-10-05T12:13:19+5:302020-10-05T12:24:27+5:30

JEE Advanced Result 2020 : आयआयटी मुंबई झोनमधून नियती मेहता ही विद्यार्थिनी मुलींमधून प्रथम आली असून तिला निकालात ६२ वे स्थान मिळाले आहे.

JEE Advanced Exam Results Announced; Chirag tops IIT Mumbai zone | मोठी बातमी! JEE Advanced परीक्षेचा निकाल जाहीर; आयआयटी मुंबई झोनचा चिराग अव्वल

मोठी बातमी! JEE Advanced परीक्षेचा निकाल जाहीर; आयआयटी मुंबई झोनचा चिराग अव्वल

googlenewsNext

मुंबई: सोमवारी सकाळी आयआयटी दिल्लीकडून जेईई अॅडव्हान्स्डचा निकाल जाहीर करण्यात आला असून आयआयटी मुंबई झोनमधून चिराग फेलोर याने प्रथम क्रमांक पटकावण्यात यश मिळविले आहे. चिरागला ३९६ पैकी ३५२ गुण मिळाले आहेत. दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर आयआयटी मद्रासचा गांगूला भुवन रेड्डी तर आयआयटी दिल्लीचा वैभव राज यांनी स्थान मिळवण्यात यश मिळवले आहे. जेईई अॅडव्हान्स्डमध्ये पात्र ठरलेले विद्यार्थी आता देशातील आयआयटी, एनआयटी आणि अन्य संस्थांमध्ये प्रवेश घेण्यास पात्र ठरले आहेत.

आयआयटी मुंबई झोनमधून नियती मेहता ही विद्यार्थिनी मुलींमधून प्रथम आली असून तिला निकालात ६२ वे स्थान मिळाले आहे. आयआयटी मुंबई झोनमधून पहिल्या पाच स्थानावर चिराग फेलोर(१), आर महेंदर राज (४), वेदांग आसगावकर (७), स्वयं चुबे ( ८) आणि हर्ष शाह ( ११) यांना स्थान मिळाले आहे.  जेईई मधील टॉप १०० विद्यार्थ्यांमध्ये आयआयटी मुंबई झोनमधून २४ , टॉप २०० मध्ये ४१, टॉप ३०० मध्ये ६३ , टॉप ४०० मध्ये ८२ तर टॉप ५०० मध्ये १०४ विद्यार्थ्यांचा समावेश आहे.

२७ सप्टेंबर २०२० रोजी जेईई अॅडव्हान्स्ड परीक्षा देशभरात आयोजित करण्यात आली होती. भारतासह परदेशातही काही केंद्रे पहोती. ज्या विद्यार्थ्यांनी या परीक्षेसाठी नोंदणी केली होती, त्यापैकी ९६ टक्के विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. १,५१,३११ विद्यार्थी पेपर १ मध्ये तर १,५०,९०० विद्यार्थी पेपर २ मध्ये सहभागी झाले होते.

Read in English

Web Title: JEE Advanced Exam Results Announced; Chirag tops IIT Mumbai zone

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.