JEE Advanced Result 2022 : IIT मुंबई झोनचा आर के शिशिर देशात पहिला; पाहा टॉपर्स लिस्ट...

By ऑनलाइन लोकमत | Published: September 11, 2022 01:47 PM2022-09-11T13:47:09+5:302022-09-11T13:47:50+5:30

JEE Advanced Result 2022 : उमेदवार अधिकृत वेबसाइट- jeeadv.ac.in वर स्कोअरकार्ड डाउनलोड करू शकतात. निकालासोबत जेईई अॅडव्हान्स 2022 ची गुणवत्ता यादीही जाहीर करण्यात आली.

JEE Advanced Result 2022 : iit bombay released iit jee advanced 2022 result check cut off toppers list here | JEE Advanced Result 2022 : IIT मुंबई झोनचा आर के शिशिर देशात पहिला; पाहा टॉपर्स लिस्ट...

JEE Advanced Result 2022 : IIT मुंबई झोनचा आर के शिशिर देशात पहिला; पाहा टॉपर्स लिस्ट...

googlenewsNext

मुंबई : इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मुंबईकडून (IIT Bombay) संयुक्त प्रवेश परीक्षा (JEE Advanced 2022) चा निकाल रविवारी सकाळी 10 वाजता जाहीर करण्यात आला आहे. उमेदवार अधिकृत वेबसाइट- jeeadv.ac.in वर स्कोअरकार्ड डाउनलोड करू शकतात. निकालासोबत जेईई अॅडव्हान्स 2022 ची गुणवत्ता यादीही जाहीर करण्यात आली.

JEE Advanced 2022 निकालात आयआयटी मुंबई झोनचा आर के शिशिर देशात प्रथम आला आहे. तर आयआयटी दिल्ली झोनची तनिष्का काबरा ही देशातून मुलींमध्ये प्रथक क्रमांकावर आहे. तनिष्का काबरा 360 पैकी 277 गुणांसह या टॉपर लिस्टमध्ये 16 व्या स्थानावर आहे. आयआयटी मुंबई झोनचे 29 विद्यार्थ्यांनी देशातील टॉप 100 मध्ये स्थान पटकावले आहे. आयआयटी मुंबई झोनच्या आर के शिशिरने 360 पैकी 314 गुण मिळवून देशात पहिला क्रमांक पटकावला आहे

जेईई टॉपर्स लिस्ट
1- आर के शिशिर
2- पोलू लक्ष्मी साई लोहित रेड्डी और थॉमस बीजू चिरामवेलिल
3- वांगपल्ली साई सिद्धार्थ
4- मयंक मोटवानी

किती विद्यार्थी झाले उत्तीर्ण? 
यावर्षी एकूण 160,038 उमेदवारांनी रजिस्ट्रेशन केले होते, त्यापैकी 155,538 उमेदवारांनी दोन्ही पेपर्ससाठी परीक्षा दिली होती. यापैकी 40,712 उमेदवार परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत.

124 शहरांमध्ये 577 केंद्रांवर परीक्षा घेण्यात आली
28 ऑगस्ट रोजी जेईई अॅडव्हान्सची परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेसाठी सुमारे अडीच लाख विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते. त्यातील केवळ 1.56 लाख उमेदवार परीक्षेला बसले होते. ही परीक्षा 124 शहरांमध्ये 577 केंद्रांवर परीक्षा घेण्यात आली. 23 इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (IIT) मध्ये एकूण 16,598 जागा आहेत, ज्यासाठी ही परीक्षा घेण्यात आली होती. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा जागांच्या संख्येत वाढ झाली आहे. तसेच महिला उमेदवारांसाठी 1,567 अतिरिक्त जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत. एकूण जागांची संख्या 2021 मधील 16,232 वरून यावर्षी 16,598 पर्यंत वाढली आहे.

निकाल अशाप्रकारे करू शकता डाउनलोड...
- सर्वात आधी JEE Advanced च्या jeeadv.ac.in अधिकृत साईटला भेट द्यावी लागेल.
- यानंतर, उमेदवाराला होम पेजवर असलेल्या JEE Advanced 2022 Result वर क्लिक करावे लागेल.
- आता उमेदवार लॉगिन डिटेल्स टाका आणि सबमिट वर क्लिक करा.
- यानंतर उमेदवाराचा निकाल स्क्रीनवर दिसेल.
- आता निकाल तपासा आणि पेज डाउनलोड करा.
- उमेदवारांनी निकालाची हार्ड कॉपी सोबत ठेवावी.

Web Title: JEE Advanced Result 2022 : iit bombay released iit jee advanced 2022 result check cut off toppers list here

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.