जेईई-नीटचे विरोधक नापास; अहवालातील निष्कर्ष, ६८ टक्के लोकांचे परीक्षा घेण्यास समर्थन

By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2020 07:20 AM2020-08-30T07:20:17+5:302020-08-30T07:20:40+5:30

केंद्र सरकारने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार आता जेईई १ ते ६ सप्टेंबर तर नीट १३ सप्टेंबर २०२० रोजी होणार आहे. काही विद्यार्थी संघटना आणि काही राज्यांतील सरकारने त्याविरोधात भूमिका घेतली आहे. दुसरीकडे दोन्ही परीक्षांसाठी जवळपास १७ लाख हॉलतिकीट डाऊनलोड करण्यात आली

JEE-Neat's opponents fail; Findings from the report, 68% of people support the test | जेईई-नीटचे विरोधक नापास; अहवालातील निष्कर्ष, ६८ टक्के लोकांचे परीक्षा घेण्यास समर्थन

जेईई-नीटचे विरोधक नापास; अहवालातील निष्कर्ष, ६८ टक्के लोकांचे परीक्षा घेण्यास समर्थन

Next

मुंबई : मेडिकल आणि इंजिनीअरिंगच्या अभ्यासक्रमासाठी देशपातळीवर घेतल्या जाणाऱ्या जेईई आणि नीटच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर झाले तरी कोरोना संक्रमण काळात या परीक्षा नको, अशी भूमिका घेत त्याला विरोध केला जात आहे. मात्र, या परीक्षा आता निर्धारित वेळेत व्हाव्यात, असे मत देशातील ६८ टक्के लोकांनी व्यक्त केले. परीक्षा नको, असे सांगणाऱ्यांची संख्या ३१ टक्केच आहे.
केंद्र सरकारने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार आता जेईई १ ते ६ सप्टेंबर तर नीट १३ सप्टेंबर २०२० रोजी होणार आहे. काही विद्यार्थी संघटना आणि काही राज्यांतील सरकारने त्याविरोधात भूमिका घेतली आहे. दुसरीकडे दोन्ही परीक्षांसाठी जवळपास १७ लाख हॉलतिकीट डाऊनलोड करण्यात आली. लोकल सर्कल या आॅनलाइन सर्वेक्षण करणाºया अग्रगण्य संस्थेने नुकताच यासंदर्भात जनतेचा कौल जाणून घेतला. २४४ जिल्ह्यांतील १० हजार ६०० जणांनी त्यावर आपली मते नोंदवली. फिजिकल डिस्टन्सिंगच्या निर्बंधांचे काटोकोर पालन करत आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची पुरेपूर काळजी घेत या परीक्षा घ्याव्यात, असे मत ६८ टक्के पालकांनी नोंदविले. तर, काही लोकांनी या विषयाबाबत पुरेशी माहिती नसल्याचे सांगत मत व्यक्त केले नाही. परीक्षेच्या विरोधातील मते ३१ टक्केच आहेत. अहवाल लोकल सर्कलच्या वतीने केंद्र सरकारला सादर केला जाईल.

Web Title: JEE-Neat's opponents fail; Findings from the report, 68% of people support the test

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.