Join us

विसर्जनावेळी जेली फिश, वामचा धोका

By ऑनलाइन लोकमत | Published: September 22, 2018 2:13 AM

रविवारी दहा दिवसांच्या गणेशमूर्तींना निरोप दिला जाणार आहे. दहा दिवसांच्या गणेशमूर्तींना निरोप देण्यासाठी गिरगाव, दादर आणि जूहू चौपाटीवर मोठा जनसागर उसळणार आहे.

मुंबई : रविवारी दहा दिवसांच्या गणेशमूर्तींना निरोप दिला जाणार आहे. दहा दिवसांच्या गणेशमूर्तींना निरोप देण्यासाठी गिरगाव, दादर आणि जूहू चौपाटीवर मोठा जनसागर उसळणार आहे. अशावेळी जनसागराला सेवा सुविधा पुरविण्यासाठी मुंबई महापालिका सज्ज झाली आहे. मात्र असे असले तरी समुद्र किनारी स्टिंग रे, जेली फिश, वाम या माशांचा धोका असून, या माशांचा गणेशभक्तांना दंश होऊ नये म्हणून महापालिकेने सुचना केल्या आहेत. परिणामी या सुचनांचे पालन करण्यात यावे, असे आवाहन महापालिकेने गणेशभक्तांना केले आहे.मत्स्यदंशापासून बचाव करण्यासाठी कोणत्याही व्यक्ती समुद्रातील पाण्यात किंवा किनाऱ्यावरील चिखलात उघड्या अंगाने अथवा अनवाणी जाऊ नये. भाविकांनी लहान मुलांची विशेष काळजी घ्यावी. त्यांना पाण्यात, विसर्जन स्थळी जाण्यापासून मज्जाव करावा. गणेशभक्तांनी मूर्तींच्या विसर्जनावेळी गमबुट घालावे. महापालिकेने केलेल्या विसर्जन व्यवस्थेचा विनामूल्य तराफ्यांचा किंवा बोटींचा वापर करावा.मद्यप्राशन करून समुद्र किनारी जाऊ नये; कारण अशा व्यक्तींवर मत्स्यदंशावरील वैद्यकीय उपचारांची परिणामकारता घटते. समुद्रातून बाहेर आल्यावर आपणास माशांचा दंश झाल्याचे जाणावल्यास तत्काळ सदर जागा स्वच्छ पाण्याने धुवावी. अथवा त्यावर बर्फ लावावा. माशांचा दंश झालेल्या ठिकाणाहून रक्तस्त्राव होत असल्यास जखमेचे ठिकाण स्वच्छ कपड्याने किंवा हाताने दाबून धरावे जेणेकरून जास्त प्रमाणात रक्तस्राव होणार नाही. मत्स्यदंश झालेल्या भाविकांनी घाबरून न जाता महापालिकेच्या समुद्रकिनाºयावरील प्रथमोपचार केंद्रात दाखल होत विनामूल्य वैद्यकीय सेवा प्राप्त करावी, अशा सुचना महापालिकेने केल्या आहेत.समुद्र किनारी अतिरिक्त बोटींची, तराफ्यांची व प्रशिक्षित मनुष्यबळाची व्यवस्था करण्यात आली आहे. महापालिकेच्या कर्मचारी वर्गासाठी आवश्यक ती साधने पुरविण्यात आली आहेत. विसर्जन स्थळी प्रखर दिव्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. अतिरिक्त सुरक्षा व्यवस्था करण्यात करण्यात आली आहे. अतिरिक्त अद्ययावत रुग्णवाहिका चौपाटयावर तैनात करण्यात आल्या आहेत.>भाविकांनी अशी घ्यावी काळजी, महापालिकेचे आवाहनखोल पाण्यात जाण्याचा प्रयत्न करू नका.भरती व ओहोटीच्या वेळांची माहिती समुद्र किनारी लावण्यात आली आहे; ती समजून घ्या.गणेशमूर्ती विसर्जनाकरिता महापालिकेतर्फे नेमण्यात आलेल्या प्रशिक्षित मनुष्यबळाची मदत घ्या.अंधार असलेल्या ठिकाणी गणेशमूर्ती विसर्जनाकरिता जाऊ नका.मोठ्या गणेशमूर्तीबरोबर प्रत्यक्षात विसर्जनाकरिता समुद्रात दाखल मंडळांच्या कार्यकर्त्यांनी शिरगणती करून जावे.महापालिकेने पोहण्याकरिता निषिद्ध केलेल्या केलेल्या क्षेत्रात जाण्याचा प्रयत्न करू नका.गणेशमूर्तींचे विसर्जन तराफ्यांचा, प्रशिक्षित मनुष्यबळाचा वापर करा.समुद्रात कोणी बुडत असल्यास त्याची माहिती अग्निशमन दलाला द्या.नाका तोंडात पाणी गेल्यामुळे श्वसनाचा त्रास होत असल्यास वैद्यकीय मदत घ्या.अफवांवर विश्वास ठेवू नका व अफवा पसरवू नका.

टॅग्स :गणेशोत्सवगणेश चतुर्थी २०१८