Join us

आर्थिक अरिष्टामुळे जेट एअरवेजची आणखी दोन विमाने जमिनीवर

By ऑनलाइन लोकमत | Published: March 06, 2019 6:11 AM

आर्थिक अरिष्टात सापडलेल्या जेट एअरवेजच्या आणखी दोन विमानांना जमिनीवर यावे लागले आहे.

मुंबई : आर्थिक अरिष्टात सापडलेल्या जेट एअरवेजच्या आणखी दोन विमानांना जमिनीवर यावे लागले आहे. मार्च महिन्याला प्रारंभ झाल्यापासून जेटची सहा विमानांची उड्डाणे बंद झाली आहेत. विमानांच्या वापराबाबत द्यावे लागणारे भाडे थकीत असल्याने उड्डाणे बंद करण्यात आली आहेत.देशातील दुसऱ्या क्रमांकाची विमान कंपनी असलेल्या जेटची एकूण २५ विमाने म्हणजे ताफ्यातील २० टक्के विमाने जमिनीवर आल्याने, कंपनीेच्या विमान वाहतुकीवर प्रतिकूल परिणाम होत आहे. विमानांची संख्या कमी झाल्याने त्याचा फटका प्रवाशांना बसू नये, यासाठी काळजी घेतली जात असून, इतर विमानांमध्ये त्यांना सामावून घेत असल्याचा दावा कंपनीने केला आहे.उड्डाणे बंद झालेल्यांमध्ये जेटने नुकतेच सेवेत आणलेल्या एअरबस ए ३३०, बोइंग ७३७ मॅक्स व बोइंग ७३७ एनजी यांचा समावेश आहे. रोज होणाऱ्या ६०० पैकी २०० उड्डाणे रद्द करावी लागत असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. जेटवर ८,२०० कोटींचा तोटा असल्याने कर्मचाºयांच्या वेतनाचा प्रश्न आहे. जेटचे प्रशासन पैसा उभारण्यासाठी प्रयत्न करत आहे.

>दररोज ६०० पैकी २०० उड्डाणांना फटकादररोज होणाऱ्या ६०० पैकी २०० उड्डाणांना फटका बसत आहे. त्यामुळे ही २०० उड्डाणे दररोज रद्द करावी लागत असल्याची माहिती जेट एअरवेजच्या अधिकाऱ्यांनी दिली.

टॅग्स :जेट एअरवेज