Join us

‘जेट’चा तिढा - जेट एअरवेजच्या उड्डाणाची शक्यता धूसर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2019 3:09 AM

कर्मचाऱ्यांत निराशा : गुंतवणुकीत स्वारस्य दाखवलेल्या हिंदुजा ग्रुपची माघार

मुंबई : दोन महिन्यांपासून बंद असलेल्या जेट एअरवेजच्या उड्डाणाला मुहूर्त मिळत नसल्याचे चित्र आहे. जेट एअरवेजची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी गुंतवणुकीत स्वारस्य दाखवलेल्या लंडनमधील हिंदुजा ग्रुपने या वाटाघाटीमधून माघार घेण्याचा निर्णय घेतल्याने जेट एअरवेजसमोरील आव्हानांमध्ये वाढ झाली आहे. सोबतच जेट सुरू होईल, या आशेवर असलेल्या हजारो कर्मचाऱ्यांची निराशा झाली आहे.

१७ एप्रिलला जेटच्या शेवटच्या विमानाचे उड्डाण झाल्यानंतर जेटची विमानसेवा ठप्प झाली आहे. हिंदुजासोबत इत्तिहाद ग्रुपने जेटमध्ये गुंतवणूक करण्याचा निर्णय स्थगित केला आहे. जेट एअरवेजमध्ये अधिक गुंतवणूक करणे चुकीचे ठरेल, असे इत्तिहादच्या संचालकांचे मत आहे. त्यामुळे इत्तिहादकडून फारसे काही सकारात्मक होण्याची शक्यता मावळली आहे. जेट एअरवेजमध्ये काही अटींवर गुंतवणूक करण्याची तयारी इत्तिहादने दाखवली होती. इत्तिहादने जेट एअरवेजमध्ये २०१३ मध्ये २०६० कोटी रुपये गुंतवून २४ टक्के हिस्सा मिळवला आहे. सध्या जेट एअरवेजला कर्मचाºयांचे वेतन व इतर बाबींवर १५ हजार कोटी रुपये देणे आहे. मात्र जेट एअरवेजने दिवाळखोरी जाहीर केल्यास जेटच्या गुंतवणूकदारांना जेटच्या ताब्यातील मालमत्ता, विमाने व इतर अनुषंगिक बाबी विक्री करून केवळ ८ हजार ४०० कोटी रुपयांचे उत्पन्न मिळू शकेल. जेट एअरवेजमध्ये गुंतवणूक करणे अत्यंत धोकादायक होण्याची भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे गुंतवणुकीच्या मुद्द्यावरून माघार घेण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती अधिकाºयांनी दिली. सरकारी चौकशी व सध्या राष्ट्रीय कंपनी लवाद (नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्यूनल) यांच्याकडे इन्सॉल्व्हन्सीबाबत जेटच्या आॅपरेशनल क्रेडिटर्सनी केलेल्या याचिकांमुळे हा निर्णय घेण्यात आल्याचे समजते.वेतन, अन्य बाबींसाठी १५ हजार कोटींचे देणेजेटच्या कर्मचाºयांचे वेतन व इतर बाबींवर १५ हजार कोटींचे देणे आहे. जेटची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी हिंदुजा ग्रुपने गुंतवणुकीत स्वारस्य दाखवल्याने जेट नव्याने उड्डाण घेईल, अशी अपेक्षा होती. पण त्यांनी माघार घेण्याचा निर्णय घेतल्याने सुमारे २२ हजार कर्मचारी निराशेच्या गर्तेत सापडले आहेत.

 

टॅग्स :जेट एअरवेजमुंबई