Join us

लोकलमध्ये राहिली दागिन्यांची बॅग

By admin | Published: November 26, 2014 12:56 AM

लाखोंचे दागिने असणारी बॅग लोकलमध्येच विसरल्यास कुणालाही त्याचा मोठा धक्का बसेल. असाच धक्का लोकलमधून प्रवास करणा:या एका महिलेला बसला.

मुंबई : लाखोंचे दागिने असणारी बॅग लोकलमध्येच विसरल्यास कुणालाही त्याचा मोठा धक्का बसेल. असाच धक्का लोकलमधून प्रवास करणा:या एका महिलेला बसला. प्रवास करताना लग्नकार्यासाठी सोबत घेऊन जात असलेली तीन लाखांच्या दागिन्यांची बॅग लोकलमध्येच विसरल्याची घटना घडली. या बॅगेचा अजूनही पत्ता लागला नसून रेल्वे पोलिसांकडून कसून शोध घेण्यात येत आहे. याबाबत सीएसटी रेल्वे पोलिस स्थानकात तक्रार दाखल करण्यात आली आहे. 
विक्रोळी टागोरनगर येथे राहणा:या नंदा दुधवडकर यांनी सकाळी 9 वाजताची विक्रोळी येथून सीएसटीला जाणारी लोकल पकडली. सीएसटीच्या दिशेने असलेल्या महिलांच्या दुस:या वर्गाच्या डब्यातून त्या प्रवास करत होत्या. त्यावेळी सोबत सुमारे तीन लाखांचे दागिने आणि कपडे असलेली बॅग होती. त्या चिराबाझार येथे नर्सरी शाळेत मुलांना शिकवण्याचे काम करतात. आपल्याच विचारात असलेल्या दुधवडकर सकाळी पावणो दहाच्या सुमारास सीएसटी स्थानकात उतरल्या. आणि सीएसटी येथून चिराबाझार येथे जाण्यासाठी टॅक्सी केली. मात्र टॅक्सीतून उतरताच आपल्याकडे असलेली बॅग नसल्याचे त्यांच्या लक्षात आले आणि एकच भंबेरी उडाली. लागलीच त्यांनी ही बाब आपल्या पतीला सांगितली आणि तात्काळ सीएसटी स्थानक गाठून रेल्वे पोलिसांत तक्रार दाखल केली. (प्रतिनिधी)
 
च्या बॅगेत  दोन अंगठय़ा, नथ, सोन्याच्या बांगडया असा ऐवज आणि कपडे होते, असे नंदा दुधवडकर यांचे पती दिपक दुधवडकर यांनी सांगितले. बुधवारी नालासोपारा येथे राहणा:या भाच्याचे लग्न होते. त्यामुळे कामावरुनच तेथे जाण्याचा बेत आखला होता.