ज्वेलर्सला बोलण्यात गुंतवून दागिन्यांची चाेरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 9, 2021 04:07 AM2021-02-09T04:07:02+5:302021-02-09T04:07:02+5:30

सहा जणांच्या टोळीला अटक : कुरार पाेलिसांची कारवाई लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : ज्वेलर्सच्या शॉपमध्ये सोने खरेदी करण्याच्या बहाण्याने ...

Jewelry theft by engaging in talking | ज्वेलर्सला बोलण्यात गुंतवून दागिन्यांची चाेरी

ज्वेलर्सला बोलण्यात गुंतवून दागिन्यांची चाेरी

Next

सहा जणांच्या टोळीला अटक : कुरार पाेलिसांची कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : ज्वेलर्सच्या शॉपमध्ये सोने खरेदी करण्याच्या बहाण्याने शिरत मालकाला बोलण्यात गुंतवायचे आणि हातचलाखीने दागिने चोरी करून पळ काढायचा अशी कार्यपद्धती असलेल्या टोळक्याला कुरार पोलिसांनी रविवारी अटक केली. अटक आराेपींमध्ये टॅक्सीचालसह दोन महिलांचाही समावेश आहे.

आशुतोष जगतनारायण मिश्रा (३३), रेखा हेमराज वाणी (४५), नरेंद्र अशोक साळुंखे (३५), अक्षय हेमराज वाणी (१९), रेणुका शेखर वाणी (२३) आणि शेखर हेमराज वाणी (३४) असे आराेपींची नावे आहेत.

कुरार पोलीस ठाण्यात अशाच प्रकारचा गुन्हा २५ जानेवारीला दाखल झाला हाेता. त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रकाश बेले यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या पथकाने चौकशी सुरू केली. सीसीटीव्ही पडताळणीदरम्यान एल ॲण्ड टी परिसरात टॉक्सीचालक आशुतोषच्या काळ्या-पिवळ्या टॅक्सीचा नंबर त्यांना सापडला. याच गाडीचा वापर आरोपींनी कुरारमध्ये गुन्हा करताना केल्याने १८ जानेवारीला त्याला अटक करण्यात आली. त्याच्या चौकशीतून अन्य आरोपींना गजाआड करण्यात आले. अटक आरोपींकडून ४५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहेत, ज्याची किंमत १ लाख ९० हजार आहे. माहीम, नेरूळ, पुणे, सातारा, बीड, रत्नागिरी, कोल्हापूर याठिकाणी या आराेपींवर गुन्हे दाखल आहेत.

.......................

Web Title: Jewelry theft by engaging in talking

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.